कोकण

३ फेब्रुवारीपासून ऋग्वेद संहिता स्वाहाकार

CD

चिपळूणमध्ये आजपासून
ऋग्वेद संहिता स्वाहाकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : येथील श्री फडके गुरुजी पुरोहित मंडळाच्यावतीने ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत वेदमूर्ती दिनकरशास्त्री जनार्दन फडके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा धार्मिक कार्यक्रम ठरवला असून, तो श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या प्रांगणात होणार आहे.
वेदशास्त्राचे शिक्षण देत अनेक विद्यार्थी घडवणारे चिपळूण येथील वेदमूर्ती फडकेशास्त्री यांनी अनेकांना वेदाध्ययनात पारंगत केले. विद्यार्थ्यांकडून ऋग्वेद संहिता स्वाहाकार व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही यागही झाले होते; मात्र, १७ मे २०२५ रोजी त्यांचे निधन झाले तसेच नुकतेच १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला फडके यांचेही निधन झाले. गुरुजींची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हा यज्ञ आयोजित केला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. यज्ञासाठी स्वेच्छेने सहकार्य करणाऱ्यांचे योगदान स्वीकारले जाईल, असेही कळवण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात २ फेब्रुवारीला प्रायश्चित्तविधीने होईल. ३ला गणेशपूजन तर ४ला अग्निमंथनाने स्वाहाकारास प्रारंभ होणार आहे. दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विधी होतील. ९ला सकाळी ११ वा. पूर्णाहुती व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT