कोकण

बहिरवली-करंबवणे पुलाचा मार्ग मोकळा

CD

बहिरवली-करंबवणे पुलाचा ५० गावांना लाभ
अंदाजपत्रक बनवण्याच्या हालचाली ; प्रलंबित प्रश्न सुटणार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बहिरवली ते करंबवणे या जगबुडी–वाशिष्टी खाडीवरील पुलाचे सविस्तर अंदाजपत्रक व तांत्रिक प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयामुळे खाडीपट्ट्यातील लोकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
दोन महिन्यांपूर्वी खाडीपट्टा विभागातील नागरिकांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंत्री आमदार योगेश कदम यांची भेट घेऊन पुलासाठी मागणी केली होती. या मागणीचे गांभीर्य ओळखून मंत्री कदम यांनी मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक पावले उचलण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चाचपणी व माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. खाडीपट्टा विभागातील नागरिकांना चिपळूण किंवा दापोलीकडे जाण्यासाठी भरणेनाकामार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. बहिरवली-करंबवणे पूल झाल्यास हा भाग थेट चिपळूणशी जोडला जाईल. यामुळे केवळ अंतरच कमी होणार नाही तर चिपळूणमार्गे दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांचे तब्बल १०० किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. परिणामी, हा पूल खाडीपट्ट्याच्या विकासाचा नवा ‘कणा’ ठरणार आहे. पर्यटन आणि रोजगाराला मिळणारी उभारी निसर्गसंपन्न खाडीपट्टा विभागात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. हा पूल झाल्यास या भागातील पर्यटनपूरक उद्योगांना मोठी चालना मिळेल. स्थानिक व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. पन्नासहून अधिक गावांचा आर्थिक आणि सामाजिक विकास या पुलावर अवलंबून आहे.
या निर्णयामुळे संपूर्ण खाडीपट्ट्यात आनंदाचे वातावरण आहे. पाठपुराव्याबद्दल स्थानिक जनतेने शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले आहेत. कदम यांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानत हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
---
चौकट
पुलाचे फायदे :
* खाडीपट्टा विभाग थेट चिपळूण शहराशी जोडला जाणार.
* प्रवासाचा मोठा वळसा कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत.
* दापोली-चिपळूण प्रवासातील १०० किमी अंतर कमी होऊन पर्यटनाला गती मिळणार
* ५०हून अधिक गावांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Pankaja Munde: बाबासाहेबांना अभिवादन नाही… अन् गाव आक्रमक! पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखलं, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT