कोकण

संस्कारक्षम बालनाट्यांचा महोत्सव रंगतदार

CD

- rat२p७.jpg-
२६O२१४९७
रत्नागिरी ः ड्रीम्स इव्हेन्टच्या बालनाट्य महोत्सवातील ‘काय ते जुनं’ या एकांकिकेतील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रेसवा)
-----
रत्नागिरीत बालनाट्य महोत्सवाचा थाट
‘ड्रीम्स इव्हेन्’टचा उपक्रम; बालकलाकारांच्या अभिनयाला रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : बालकलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील ''ड्रीम्स इव्हेन्ट''तर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित बालनाट्य महोत्सव उत्साहात पार पडला. संस्कारक्षम नाटकांमधून मनोरंजनासोबतच प्रबोधनाचा जागर या महोत्सवात पाहायला मिळाला.
बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील ड्रीम्स इव्हेन्टतर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रविवारी (ता. १) झालेल्या बालनाट्य महोत्सवाचे उद्‍घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात पटवर्धन हायस्कूल, दामले विद्यालय (रत्नागिरी), युथ फोरम (देवगड), अलंकार अकादमी (कोल्हापूर) येथील बालकलाकारांच्या अभिनयाला पालक, ज्येष्ठ रंगकर्मी रसिकांनी दाद दिली. या वेळी नगराध्यक्ष सुर्वे यांच्यासह बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेवक व उद्योजक सौरभ मलुष्टे, नगरसेवक श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, दीपक पवार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, सतीश दळी, बालरंगभूमीचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, निवृत्त मुख्याध्यापक शौकत गोलंदाज, सीमा कदम, पटवर्धन हायस्कूलचे विश्वस्त विनायक हातखंबकर तसेच ड्रीम्स इव्हेन्टचे शहबाज गोलंदाज व निरंजन सागवेकर आदी उपस्थित होते.
बालनाट्य महोत्सवाची सुरवात येथील पटवर्धन हायस्कूलची ‘धोंड’ या बालनाट्याने झाली. या बालनाट्यात सध्या मोबाईलच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येकाने पाहावे, अशी संहिता शिक्षक योगेश कदम यांच्या लेखणीतून उतरली होती. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या बालनाट्यात अभिनय साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यानंतर देवगड येथील युथ फोरमचे ‘लगोरी’ बालनाट्य झाले. रस्त्यावर राहणारी मुले आणि उच्चभ्रू घरातील मुलांचे प्रेम यात साकारण्यात आले. दुपारच्या सत्रात कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमीचे ‘चेटकिणीच्या बंगल्यात’ बालनाट्य सादर झाले. अभ्यास न करणाऱ्या मुलांच्या उपद्व्यापावर प्रकाश टाकणाऱ्या या बालनाट्याला रसिकांनी दाद दिली. रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळा क्र.१५ अर्थात् दामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘काय ते जुनं’ ही नाट्यकृती सादर केली. इतिहासाचा मागोवा घेणारे या बालनाट्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT