कोकण

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत धोपेश्वर संघ विजयी

CD

rat२p१५.jpg -
२६O२१५१९
राजापूर ः विजयी साई चॅलेंजर धोपेश्वर संघाला आकर्षक चषक आणि रोख रक्कमेचे बक्षिस देऊन गौरवताना राजापूर क्रिकेट समितीचे सल्लागार रवींद्र नागरेकर.
----
क्रिकेट स्पर्धेत धोपेश्वर संघ विजयी
राजापूर क्रिकेट समितीतर्फे आयोजन ; भालावली संघ उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः राजापूर क्रिकेट समितीच्यावतीने आयोजित केलेल्या मर्यादित षट्कांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर संघाने चॅम्पियन्स भालावली संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. चॅम्पियन्स भालावली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर, निनादेवी डोंगर संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघाला ५१ हजार १११ रु., उपविजयी संघाला २५ हजार १११ रु. आणि तृतीय क्रमांक विजेत्या संघाला १५ हजार १११ रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. या वेळी राजापूर क्रिकेट समितीचे सल्लागार रवींद्र नागरेकर, राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे, योगेश नकाशे, राजापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, अ‍ॅड. महेश नकाशे, पडवेचे उपसरपंच संतोष तांबे, अरविंद लांजेकर, नगरसेवक दिलीप अमरे, सुभाष नवाळे, अ‍ॅड. प्रवीण नागरेकर, क्रिकेट समितीचे पदाधिकारी महेश गोंडाळ, प्रशांत नागरेकर, अमित चंदूरकर, अरविंद लिगम, राजेश जोशी, सचिन राऊत, सुधीर तेरवणकर आदींसह मोठ्या संख्येने क्रिकेटपटू उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले होते. यामध्ये शेवटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात साई चॅलेंजर धोपेश्वर संघाने चॅम्पियन्स भालावली संघाचा पराभव केला. या स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये निवृत्ती भोसले याला मालिकावीर, वैभव मांजलकर उत्कृष्ट फलंदाज तर देवेंद्र कदम याला उत्कृष्ट गोलंदाज आणि हर्षद चापडेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून मंगेश ढवळे, ऋषी अमरे व भाई गाडगीळ यांनी जबाबदारी सांभाळली. समालोचक म्हणून रमेश चव्हाण, नरेंद्र कामतेकर व अरविंद लांजेकर यांनी भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT