कोकण

चिपळूण - कराडसाठी तरतूद किती

CD

चिपळूण- कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी निधीची प्रतीक्षा
केंद्राचे दुर्लक्ष कायम; वैभववाडी-कोल्हापूरचा प्रश्न मार्गी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात राज्यातील रेल्वेप्रकल्पासाठी २३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे; मात्र कऱ्हाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गासाठी निधीची कोणती तरतूद केली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या मार्गासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते पाठपुरावा करत आहेत; मात्र सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
कऱ्हाड-चिपळूण नवीन रेल्वेलाइन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. ७ मार्च २०१२च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या वेळी या प्रकल्पाची किंमत ९२८.१० कोटी रुपये होती. त्यानुसार राज्य सरकारची ५० टक्के हिश्श्याची रक्कम ४६४.०५ कोटी इतकी होती. केंद्राने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षांत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या दरम्यान, कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारित अंदाजित रक्कम ३ हजार १९६ कोटी झाली आहे.
रेल्वे मंत्रालयाने सहभाग धोरण २०१२ अंतर्गत चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गास संयुक्त उपक्रमाद्वारे राबवण्यास मंजुरी दिली. या उपक्रमात मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली आणि भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यादरम्यान प्रत्येकी २६ आणि ७४ टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी राज्यशासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्यशासनाने ८० टक्के भार उचलावा, असे राज्यशासनास कळवले; मात्र, राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली. यावर केंद्राकडून अद्याप काही कळवण्यात आलेले नाही. त्यामुळे ४० वर्षाची मागणी अजूनही प्रलंबित आहे. महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून कऱ्हाड-चिपळूण आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेप्रकल्पास मान्यता दिली; मात्र चिपळूण -कऱ्हाड रेल्वेमार्ग उपेक्षितच राहिला आहे.

कोट
राज्यातील रेल्वेप्रकल्पासाठी केंद्र सरकारने २३ हजार कोटीची तरतूद केली आहे, ही आनंदाची बाब आहे. या पैशातून चिपळूण-कऱ्हाड रेल्वेप्रकल्पाला चालना मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
--प्रशांत यादव, नेते भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: मुंबईत कोणतीही मुलं बेपत्ता झालेली नाहीत, पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT