rat2p21.JPG-
21546
दापोली ः स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवेळी गीतगायन करताना शिक्षक.
--------
दापोलीत पथनाट्य, गीतगायनातून मतदार जनजागृती
जिल्हा परिषद निवडणूक ; कलापथकाची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ः रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘स्वीप मतदार जनजागृती कलापथक’ स्थापन केले आहे. या कलापथकाच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य व मतदार जागृतीपर गीतगायनाचे प्रभावी सादरीकरण करण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व, लोकशाही मुल्ये व निष्पक्ष मतदानाचा संदेश देण्यात येत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे यांच्या प्रेरणेने तसेच गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे व गुलाबराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या कलापथकाची निर्मिती केली आहे. या पथकात बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, संजय मेहता, संतोष सकपाळ, नितीन गुहागरकर, अस्मिता बालगुडे, स्मिता कदम, संजीवनी लाडे व वैजन देवघरकर हे शिक्षक सहभागी असून, ते प्रभावी सादरीकरणातून मतदार जनजागृती करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.