विक्रीच्या उद्देशाने १२ जनावरे
बांधून ठेवल्यामुळे गुन्हा
दारिस्ते गुरववाडी येथील प्रकार
कणकवली, ता. २ : दारिस्ते (ता. कणकवली) येथील गुरववाडी येथे एका व्यक्तीने विक्रीसाठी १२ गुरे आणून बांधून ठेवल्याप्रकरणी त्याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव गुरव (वय २९, रा. दारिस्ते गुरववाडी), असे संशयिताचे नाव आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद संस्थेकडून पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारिस्ते गुरववाडी येथे एका व्यक्तीने विक्रीसाठी पाळीव जनावरे आणल्याची फिर्याद बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर कणकवली पोलिस निरीक्षकांनी पोलिसपाटील हेमंत सावंत (रा. दारिस्ते) यांना गावात जाऊन वस्तुस्थिती पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार श्री. सावंत यांनी दारिस्ते गुरववाडी येथील वासुदेव भरत गुरव (वय २९) यांच्या शेत जमिनीमध्ये जाऊन पाहिले असता गाय, बैल आणि वासरू अशी १२ जनावरे आढळून आली. या सर्वांची किंमत ९८ हजार ५०० रुपये आहे.
दारिस्ते येथे जनावरे आणल्यानंतर वासुदेव गुरव यांनी या जनावरांना चाऱ्या-पाण्याची व्यवस्था अपुरी केली आहे. त्यांना बांधून ठेवले आहे. तसेच विक्रीच्या उद्देशाने ही जनावरे आणली आहेत, असा अहवाल पोलिसपाटील हेमंत सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिला. त्यानुसार दारिस्ते येथील वासुदेव गुरव याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) ख (फ), (ह) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम ११९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सुनील वेंगुर्लेकर अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.