पादचाऱ्याला
टेम्पोची धडक
रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्यावर जाकादेवी मच्छीमार्केट येथे टेम्पोने पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाला. संशयित टेम्पोचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश भालचंद्र महाकाळ (रा. आगरनरळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३१ जानेवारीला सायंकाळी जाकादेवी मच्छीमार्केट रस्त्यावर घडली. संशयित हा टेम्पो घेऊन रात्री निवळी ते जयगड जात होता. जाकादेवी बाजारपेठ येथे रस्त्यावरून जाणाऱ्या मिथुन दत्ताराम घाणेकर (रा. तरवळ, रत्नागिरी) यांना धडक दिली. या प्रकरणी कैलास दत्ताराम खेडकर (वय ४९, रा. खालगाव, जाकादेवी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वृद्धाला धडक देणाऱ्या
स्वाराविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ एसटी स्टॉप (ता. संगमेश्वर) येथे रस्ता ओलांडताना दुचाकीने वृद्धाला धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश शंकर रेवाळे (वय २६, रा. माहीम, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.१) दुपारी तुरळ बसथांबा येथील रस्त्यावर घडली. फिर्यादी एकनाथ रंगा बेटकर (वय ५६, रा. शेनवडे, ता. संगमेश्वर) यांच्या गावातील तानाजी गोपाळ बेटकर (वय ७६, रा. शेनवडे, संगमेश्वर) हे एसटीतून उतरून पायी महामार्ग ओलांडून जात असताना संशयित संदेश रेवाळे या दुचाकीस्वाराने तानाजी बेटकर यांना धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. या प्रकरणी एकनाथ बेटकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.