21668
लोगो ः जि.प.,पं.स.निवडणूक
---
सभांपेक्षा भेटीगाठींवरच उमेदवारांचा भर
देवगड तालुक्यातील चित्र; ग्रामीण भागात प्रचाराला वेग
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा दोन दिवसांनी पुढे गेल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आहे. तालुक्यात अजून तरी राजकीय पक्षांच्या जाहीर प्रचारसभांकडे कल नूसन घरोघरी प्रचारयंत्रणा राबवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या प्रचाराचे जोरदार वारे दिसत आहेत.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने केवळ ३ जागांवरच निवडणूक होत आहे, तर पंचायत समितीच्या १४ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्याने ८ जागांवर निवडणूक होत आहे. पंचायत समितीच्या सर्वच ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. उमेदवारांनी मतदारसंघात घरोघरी जात प्रचार करण्यावर अधिक भर दिला आहे. आवाहन पत्रकांचे वाटप करून मतदारांना आपल्या विकासाच्या कल्पना पटवून दिल्या जात आहेत. कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह प्रचार केला जात आहे. दुपारनंतर प्रचार करण्याकडे अधिक कल असतो. सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकडे लक्ष असते. सध्या आंबा हंगाम असल्याने बागायतीमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदार घरी भेटण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी, आंबा बागायतदार यांच्या भेठी होण्यासाठी दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत प्रचार करण्यावर भर असतो. प्रचारामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याने घरोघरी महिला मतदारांच्याही भेटी घेतल्या जात आहेत. विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना जाहीर सभा बाजूला ठेवून कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी थेट मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.
.......................
साथ सोशल मीडियाची...
सध्या सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावी वापर केला जात असल्याचे चित्र आहे. प्रचाराचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर टाकून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या भावना आणि विकासाच्या संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. त्यामुळे एकीकडे प्रत्यक्ष मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, तर दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर, असा दुहेरी प्रचार सुरू आहे.
.......................
प्रशासकीय धावपळ
शनिवारी (ता.७) तालुक्यात मतदान होणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा सध्या कामात व्यस्त आहे. एकीकडे उमेदवारांचा प्रचारावर भर आहे, तर दुसरीकडे निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. आता मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.