कोकण

बिबट्याची दहशत अखेर ''थंड''

CD

swt32.jpg
21761
कासः पिंजऱ्यात जेरबंद केलेला बिबट्या.

कास परिसरातील बिबट्या जेरबंद
ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास; वन कर्मचाऱ्यांची मोहीम यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ३ ः कास दाभाळवाडी परिसरात गेले काही दिवस भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून जेरबंद केले. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी ही मोहीम यशस्वी केली.
गेले दोन महिने कास दाभाळवाडी व नजिकच्या गावांमध्ये भरवस्तीत बिबट्याने दहशत माजवली होती. पाच ते सहा पाळीव कुत्रे आणि बकऱ्यांना भक्ष्य केले होते. वारंवार हा बिबट्या ग्रामस्थांच्या दृष्टीस पडत होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. शेतकरी, महिलांसह विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले होते. याबाबत वारंवार येथील ग्रामस्थांनी आवाज उठवून वनविभाग तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
सध्या काजूचा हंगाम सुरू झाला आहे; मात्र बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थ काजू बागेत जाण्यास घाबरत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्या घराच्या अंगणात येऊन पाळीव जनावरांना लक्ष्य करत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.
त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अखेर वनविभागाने सोमवारी सायंकाळी (ता. २) बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवली.वन कर्मचारी रेडकर पथकासमवेत दाखल झाले. बिबट्या सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे भक्ष्याच्या शोधात आला असता पिंजऱ्यात असलेल्या बकरीला पकडण्यासाठी पिंजऱ्यात गेला आणि जेरबंद झाला. बिबट्याला जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून वनविभागाचे आभार मानले.
यावेळी सुभाष भाईप, योगेश भाईप, शुभम फाटक, आनंद राणे, देवेंद्र परब, गोपाळ सावंत, राकेश आम्रुसकर, वनरक्षक प्रकाश रानगीर, वनसेवक चंद्रकांत पडते हे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT