- rat३p१४.jpg-
२६O२१७७२
साखरपा : हळदीकुंकू देताना चक्रभेदीच्या वैदेही सावंत.
----
साखरप्यात विधवा महिलांसाठी हळदीकुंकवाचे आयोजन
चक्रभेद फाउंडेशनचा अगळा वेगळा उपक्रम; सामाजिक परिवर्तनाचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३ ः संक्रांतीच्या निमित्ताने सर्वत्र हळदीकुंकवाचे कार्यक्रम होत असताना समाजातील वंचित विधवा आणि एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चक्रभेद सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. ‘सामाजिक परिवर्तनाचे पाऊल’ म्हणून संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे या विशेष हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साधारणपणे हळदीकुंकूसारख्या मंगलकार्यात विधवा महिलांना सहभागी करून घेण्यास समाजात टाळले जाते. ही अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी आणि या महिलांना समाजात आदराचे स्थान मिळावे, या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले. या कार्यक्रमात केवळ संगमेश्वरच नव्हे तर चिपळूण, लांजा, रत्नागिरी आणि खेड या पाच तालुक्यांतील सुमारे १५० विधवा व एकल महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत यांनी उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू लावून वाण, पानसुपारी आणि तिळगूळ देऊन त्यांचा गौरव केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणिता घोलपे, दीक्षा माने, वैदेही किरवे, श्रद्धा प्रसादे, मनीषा बामणे, दीपाळी गावडे आणि कविता काजरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता.
----
कोट
पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडणे, जोडवी काढणे किंवा कुंकू पुसणे यांसारख्या प्रथा महिलांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या आहेत. अशा अनिष्ट प्रथा आता बंद होण्याची गरज आहे.
- वैदेही सावंत, संस्थापिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.