-rat३p६.jpg-
P२६O२१७८०
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत अमर हिंद मंडळ-दादर या संस्थेने केलेल्या ‘रेशनकार्ड’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
राज्य नाट्य स्पर्धा --------लोगो
कुटुंबातील परंपरा, नाती जपणारे ‘रेशनकार्ड’
अमर हिंद मंडळाचे सादरीकरण ; अभिनय, नेपथ्यासह ट्रिकसिनला दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः जीवनात येणाऱ्या सुख-दुःखातही माणसे एकत्र असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो. जुन्याजाणत्या बुजुर्गांनीही परंपरा जपली, कुटुंबं एकत्रित ठेवली, नाती जपली; पण अलीकडे सगळचं बदलले आहे. ग्रामीण भागात वृद्ध आई-वडील एकटे राहतात तर त्यांची मुले मुंबईत घेऊन जातात. त्यामुळे आज गावं ओस पडत आहेत. कुटुंबातील नात्यांमध्ये दुफळी निर्माण होते, याचे उत्तम दर्शन राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या प्रथम पुष्पात ‘रेशनकार्ड’ या नाटकातून रसिकांना पाहायला मिळाले. लेखक-दिग्दर्शक प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग अमर हिंद मंडळ-दादर या संस्थेने सादर केला. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २५ कलाकारांचा अभिनय, उत्तम नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा अशा चोहोबाजूनी रंगले.
-------
ग्रामीण जीवनावर आधारित मधुर मालवणी भाषेचा लहेजा असलेले नाटक ‘रेशनकार्ड’ ची संहिता. परब आजोबांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा सुभाष आईला गावातून मुंबईत घेऊन येतो. मुंबईत तिचा एकाकीपणा वाढतो. शेजारी बापट काका व शेजारी तिला बोलण्यासाठी प्रवृत्त करतात; पण शक्य होत नाही. इकडे सुभाष यांचे मुलगा अभिषेक व मुलगी यांचे एकमेकांबरोबर पटत नाही. दररोज किरकोळ कारणातून खडाजंगी होत असते. या सगळ्यांना आई सावरून घेत असते. त्यांचा संसार विभक्त होण्याच्या मार्गावर असतो. बापट काका सुभाष आणि त्यांचा मुलगा अभिषेक व दीदी एकत्र यावेत म्हणून ते झटत असतात; पण नव्या पिढीच्या विचार पटत नसल्यामुळे त्यांनाही ते शक्य होत नाही. अखेर बापट काकाही एकलेपणाच्या त्रासाने आत्महत्या करतात. इकडे अभिषेक कंपनीत पदोन्नतीचे कागद जोडण्यासाठी आईकडे रेशनकार्ड मागत असतो. प्रमोशन मिळाल्यावर तो चाळीतील खोली सोडून जाणार असतो. त्याचे एका मुलीबरोबर प्रेम असते. दीदीला पण चांगली नोकरी लागते; पण भावंडांमध्ये कधीच पटत नाही. एके दिवशी आई रेशनकार्ड लपवून ठेवते. अनेक दिवस अभिषेक कार्ड मागत असतो; पण देत नाही. एके दिवशी आई-वडील, अभिषेक, दीदी ही रेशनकार्ड शोधण्यासाठी घरातील सगळे सामान बाहेर काढतात; पण रेशनकार्ड मिळत नाही. त्या वेळी वडिलांनी तरुणपणी आईला लिहिलेली चिठ्ठी सापडते. आई-वडिलांच्या लग्नाचा अल्बम सापडतो आणि सगळं कुटुंब एकत्र येते. आई लपवलेले रेशनकार्ड अभिषेकला देते. कुटुंब, नाती एकत्र आल्याचा आनंद व्यक्त होत असतो. त्याचवेळी दोघेजण परब काकूचा रस्त्यावर अपघात झाला, असे सांगतात. काही क्षणात आईही तेथून गायब होते. एकत्र कुटुंबपद्धती का हवी हसते, खेळते घर का असावे, या प्रश्नांची उत्तरे या नाटकातून मिळतात. नेपथ्यासह उत्तम ट्रिकसिनचा वापर मालवणी भाषेतील एकत्र कुटुंबपद्धतीवर टाकलेला प्रकाश रसिकांना चांगलाच भावला होता.
-------
सूत्रधार आणि सहाय्य
रंगभूषा ः अनिल कासकर, रंगभूषा सहाय्यक ः सीमा कोल्हटकर, प्रकाशयोजना ः संजय तोडणकर, सहाय्यक ः नितीन बाईकर, विजय ठीक, सार्थक चव्हाण, विजय राणे, जान्हवी मगर, सोनाली साळवी. वेशभूषा ः योगिता बेडेकर, संगीत ः सम्राट साळवी, संगीत संयोजन ः नितेश परब, नेपथ्य ः समीर चव्हाण.
-----
पात्र परिचय
आई-प्रियांका जंगम, सुभाष- सुभाष तोडणकर, दीदी-विजया गुंडप, अभिषेक-समीर चव्हाण, छोटा अभिषेक ः राजवीर आवळे, छोटी दीदी ः माऊली साळवी, आजी ः योगिता बेडेकर, तात्या परब ः सज्योत मयेकर, पाटील काकू ः अपेक्षा रानडे, भटजी ः निनाद शिंदे आणि सोबत शांतनू रसाळ, रोहित भांडवलकर, प्राजक्ता जोगदंड, वेधान दारोळे, सानिका ठकार, श्रेया कापडी, देवेज्ञ गवळी, सोनल मसळे, ओंकार खुलिंगे, प्रतीश म्हाडगूत, सुमेध कदम, प्रताप आधाने, प्रेरणा रातांबे, कौशल राणे.
---------
आजचे नाटक
नाटक ः प्रतिषिद्ध. सादरकर्ते ः लोहितवादी मंडळ नाशिक, स्थळ ः स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृह. वेळ ः सायं. ७.३० वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.