गिरोडे येथील बेकायदेशीर
बांधकामावर कारवाई करा
ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३ : गावातील रस्त्यालगत करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी गिरोडे ग्रामस्थांनी आज दोडामार्ग तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गिरोडेतील मुख्य रस्त्यालगत बहुमजली इमारतीचे बांधकाम बेकायदेशीरपणे केले आहे. मुख्य रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्यासाठी खोदकाम केले आहे. ही दोन्ही बांधकामे बांधकामासंबंधीचे सर्व कायदे, नियम धाब्यावर बसवून करण्यात येत आहेत. त्यामुळे या बांधकामांवर कायदेशीर कारवाई करावी. रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधकाम करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोवा आणि दिल्लीतील अनेकांनी या गावात जमीन घेऊन वेगवेगळे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. महावितरण, महसूल, भूमी अभिलेख, बांधकाम या खात्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना व ग्रामपंचायतीला हाताशी धरून परप्रांतीय लोक बेकायदेशीर गोष्टी करत आहेत. त्यांच्याकडून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. मात्र, सगळेच अधिकारी, कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवेदनावर रामा गावडे, विकास गावडे, महादेव गावडे, अनिल गावडे, विष्णू नाईक, विठोबा गावडे, तुषार गावडे यांची स्वाक्षरी आहे.
................
कंपनी म्हणते कायदेशीर काम!
दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी संबंधित कंपनीचे व्यवस्थापक सुनील गवस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘गिरोडे येथे चालू असलेल्या इमारतीचे काम हे कायदेशीर परवानगी घेऊनच करण्यात येत आहे. ग्रामस्थांची कोणी दिशाभूल करीत असेल तर त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांचे कोणतेही नुकसान होणार नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.