कोकण

रत्नागिरी- केदार लिंगायत अलंकार परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

CD

rat3p21.jpg-
21808
केदार लिंगायत
--------

केदार लिंगायत अलंकार परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
रत्नागिरी, ता. ३ : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या गायन, वादन आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये तबला विषयात केदार लिंगायत हे अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
वडील (कै.) कृष्णा लिंगायत उत्तम साथसंगत करत असल्याने लहानपणापासूनच केदार यांना वादनाचे बाळकडू मिळाले आहे; मात्र २००४ पासून केदार यांनी तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरवात केली. सुरवातीला (कै.) विनायकबुवा रानडे, हेरंब जोगळेकर, प्रसाद करंबेळकर आणि सध्या पंडित आमोद दंडगे यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. २०१३ पासून ते रियाज तबला ॲकॅडमी आणि स्वरनिनाद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून वादनाची आवड असलेल्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच मुकुल माधव विद्यालय आणि जीजीपीएस स्कूल मधील (कै.) यशवंतराव पटवर्धन संगीत ॲकॅडमीमध्ये तबला संगीतशिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
सध्या सुमारे १५० विद्यार्थी केदार लिंगायत यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. त्यांचे आतापर्यंत ११ विद्यार्थी तबला विशारद झाले आहेत. अजून खूप शिकून रत्नागिरीत तबल्यात नवीन पिढी घडवण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे अलंकार प्रथम तबला परीक्षेत निखिल रानडे हे उत्तीर्ण झाले. गायन विषयात मयुरेश जायदे हे अलंकार प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाले. कथक विषयातून दर्शना लोध-कामेरकर यांच्या विद्यार्थिनी आसावरी आखाडे (अलंकार पूर्ण), मृणाली डांगे (अलंकार पूर्ण), अनुजा गांधी (अलंकार पूर्ण), धनश्री मुरकर (अलंकार प्रथम), रुपाली करमरकर (अलंकार प्रथम) तसेच गुरू शिल्पा मुंगळे यांच्या विद्यार्थिनी आकांक्षा साळवी (अलंकार पूर्ण), सोनम जाधव (अलंकार पूर्ण) उत्तीर्ण झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे बारामती विमान दुर्घटनेतील मृत पिंकी माळीच्या निवासस्थानी दाखल होणार

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT