कोकण

रत्नागिरी - पोलिस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक २ बसेस

CD

rat3p1.jpg
21738
रत्नागिरी ः पोलिसदलात दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘सर्व्हिलन्स एसएमएल’बस.

पोलिसदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक बसेस
३६० अंश कोनातून लक्ष ठेवणे शक्य; पोलिस अधीक्षकांच्या हस्ते उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि गर्दीवर करडी नजर ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक ‘सर्व्हिलन्स एसएमएल’ बस दाखल झाल्या आहेत. या बसच्या चारही बाजूंना हायडेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मोर्चे, आंदोलने आणि संवेदनशीलप्रसंगी परिसरावर ३६० अंश कोनातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच संशयास्पद हालचालींवर तातडीने कार्यवाही करणे पोलिसांना सुलभ होईल.
महाराष्ट्र राज्याचे अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) यांच्या माध्यमातून या विशेष बस जिल्हा पोलिसदलास प्राप्त झाल्या असून, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते या वाहनांचे उद्‌घाटन करण्यात आले. बसच्या चारही बाजूंना हायडेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. छतावर फोल्डेबल रेलिंग बसवण्यात आले असून, काही क्षणांतच तिथे एक सुरक्षित निरीक्षण मंच (प्लॅटफॉर्म) तयार करता येतो ज्यामुळे मोर्चे, आंदोलने, बंदोबस्त आणि कोणत्याही संवेदनशीलप्रसंगी परिसरावर ३६० अंश कोनातून बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि संशयास्पद हालचालींवर तातडीने कार्यवाही करणे पोलिसांना अधिक सुलभ होईल. बसच्या आतूनच छतावर जाण्यासाठी शिडीची सुविधा उपलब्ध आहे. या मंचावर छत्री लावण्यासाठीही स्वतंत्र जागा देण्यात आली आहे जेणेकरून कोणत्याही हवामानात पोलिस अधिकारी आणि अंमलदार उंचावरून परिस्थितीचे प्रभावी निरीक्षण करू शकतील. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी हे पाऊल महत्त्वपर्ण ठरणार आहे.
बसच्या उद्घाटनावेळी अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके यांच्यासह विविध पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा हा वापर जिल्ह्यातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT