कोकण

कोकणच्या मातीत उगवला ''टर्निप''

CD

-rat३p२६.jpg-
२६O२१८१७
दापोली ः कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी टर्निप पद्धतीने केलेली भाजी लागवड.
------
कोकणच्या मातीत उगवला ‘टर्निप’
दापोलीत विद्यार्थ्यांचा प्रयोग; कोकण कृषी विद्यापीठाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३ ः कोकणातील शेतीत आता प्रगत आणि एक्झॉटिक भाज्यांचे वारे वाहू लागले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दापोलीत प्रथमच ‘टर्निप’ या परदेशी भाजीची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेला हा प्रयोग यशस्वी झाला असून, सध्या ही भाजी विक्रीसाठी सज्ज झाली आहे.
कोकणात प्रामुख्याने भात आणि आंबा-काजूची शेती केली जाते; मात्र, विद्यार्थ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या एक्झॉटिक भाज्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीसाठी एक नवीन दिशा मिळाली आहे. परदेशी भाज्यांना शहरी बाजारपेठेत मोठी मागणी आणि चांगला भाव मिळत असल्याने ‘टर्निप’ या परदेशी भाजीची यशस्वी लागवड करण्यात आली. हा प्रयोग भविष्यात शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकणार आहे. विद्यार्थ्यांनी पिकवलेला हा ताजा आणि दर्जेदार भाजीपाला खरेदी करण्यासाठी दापोलीकरांना ‘नर्सरी नंबर १०’ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष शेती पाहता येणार असून, ताजा भाजीपाला जागेवरच विकत घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
------
चौकट
भाजी विक्रीसाठी बाजारात
विद्यार्थ्यांनी या प्रयोगाअंतर्गत भाजीपाल्यांचे नंदनवन फुलवले आहे. त्यामध्ये टर्निप, झुकिनी, नवलकोल आणि मधुमका या एक्झॉटिक भाज्या, कोबी, फुलकोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी यासारख्या नियमित भाज्या, दुधी भोपळा, कलिंगड, काकडी, पडवळ, शिराळ, घोसाळ आणि घेवडा यासारख्या वेलवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. यातील अनेक भाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, उर्वरित पिके लवकरच ग्राहकांसाठी बाजारात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: जिवंत लोक ‘मृत’ दाखवले? CJI सूर्यकांत यांच्यासमोर ममता बॅनर्जी आक्रमक; निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

''प्राची बॉस होती, निशिका-पाखी तिचं ऐकायच्या, रात्री २ वाजता त्यांनी...''; तीन बहिणींनी जीवन संपवल्याप्रकरणी वडिलांचा धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलसाठी जागा मंजूर

Sangli Municipal Corporation : भाजपकडून महापौरपदी धीरज सूर्यवंशी निश्‍चित, गजानन मगदूम उपमहापौर अर्ज भरणार

SCROLL FOR NEXT