-rat३p१६.jpg-
P२६O२१७७८
खेड ः ब्रह्मकुमारी सुनंदा बहेन यांचा खेड येथे विविध संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
-------
ब्रह्मकुमारी सुनंदा बहेन यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण अभियानांतर्गत ५८ हजार युनिट वीजबचत केल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ब्रह्मकुमारी सुनंदा बहेन यांचा गौरव करण्यात आला. त्या निमित्ताने खेड शहरात त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात झाला.
खेडवासियांच्यावतीने तसेच शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी संस्थांच्या सहभागातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ब्रह्मकुमारी सुनंदा बहेन यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष माधवी बुटाला, उद्योजक अमोल बुटाला, गीता बहेन, स्वरूपा बहेन व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी ब्रह्मकुमारी सुनंदा बहेन यांनी केवळ वीजबचतच नव्हे तर आपल्या संकल्पांची व वेळेचीही बचत करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत झालेल्या भेटीतील प्रेरणादायी क्षणांची अनुभूती त्यांनी सांगितली.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.