कोकण

सावंतवाडीत ‘बीएसएनएल’ धारेवर

CD

21879
सावंतवाडी : ‘बीएसएनएल’चे जिल्हा प्रबंधक आर. व्ही. जुन्नू यांना निवेदन देताना प्रयाण महिला टूरिझम संस्थेच्या पदाधिकारी.

सावंतवाडीत ‘बीएसएनएल’ धारेवर

महिलांचा अधिकाऱ्यांना जाब; सेवा न सुधारल्यास मोर्चाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी तालुक्यात मोबाईल नेटवर्कच्या सततच्या समस्येबाबत बीएसएनएलचे जिल्हाप्रमुख आर. व्ही. जुन्नू यांना प्रयाण महिला टूरिझम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. दोन महिन्यांत जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी तालुका आणि शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णतः कोलमडली आहे. ग्रामीण भागात तर मोबाईलला नेटवर्क येत नसल्याने ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत. बऱ्याचवेळा मोबाईलवर संभाषण सुरू असताना अचानक समोरच्या व्यक्तीला आवाज न जाणे, इंटरनेटच्या सेवेतही वारंवार व्यत्यय येणे असे बरेच प्रकार बीएसएनएलच्या सेवेमध्ये होत आहेत. एकीकडे तक्रारी करूनही या तक्रारीचे निवारण होत नाही. बऱ्याच गावांतून बीएसएनएलच्या कार्यालयामध्ये धडक देत याबाबत जाब विचारले जात आहेत; परंतु मनुष्यबळ आणि अन्य कारणे सांगून टोलवाटोलवीची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.
दरम्यान, महिलांच्या समस्येला उत्तर देताना श्री. जुन्नू निरुत्तर झाले. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरातील हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा उपस्थित महिलांनी दिला. यावेळी संस्थेच्या सदस्या माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, सायली होडावडेकर, लतिका सिंग, शामिदा रेडकर, सत्त्वशिला उपवडेकर, स्मिता नाटेकर, कमल मांडवकर, दीपाली सावंत, उर्मिला दापले, प्रमिला नाटेकर, लक्ष्मी मेस्त्री, रत्नाकर मेस्त्री, सुजाता वारंग, अस्मिता साईल, नासीर पटेल आदी उपस्थित होत्या.
---
सेवेत बऱ्याच अडचणी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात बीएसएनएलचे ग्राहक आहेत. आता सगळीकडे खासगी कंपनीचे नेटवर्क पसरले असताना अनेकांनी बीएसएनएल सेवा बंद करत खासगी सेवा सुरू केली आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या खिशाला खासगी मोबाईल सेवा परवडत असल्याने आजही अनेकजण बीएसएनएल नेटवर्कवर अवलंबून आहे; मात्र नेटवर्कमध्ये बऱ्याच अडचणी असल्याने अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
----
...अखेर जाब विचारला
फोरजी नेटवर्कमुळे या अडचणी निर्माण होत असल्याचे वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, परंतु त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्याने आज अखेर प्रयाण महिला टूरिझम संस्थेच्या माध्यमातून संस्थापक-अध्यक्ष अनारोजीन लोबो आणि जिल्हाध्यक्षा अपर्णा कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सामाजिक क्षेत्रातील महिलांनी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक श्री. जुन्नू यांच्या कार्यालयाला धडक देत जाब विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT