swt41.jpg
O22031
वालावल ः पाणथळ दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर्स स्पर्धेमधील शीतल गोसावी हिला गौरविताना प्रा. स्मिता सुरवसे, राजेश प्रभू, राजू बंगे, नारायण कोठावळे व अन्य. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘पाणथळ’ जागा संवर्धनाचा संदेश
वालावल ग्रामपंचायतीचा उपक्रम; पोस्टर्स स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः पाणथळ दिनाच्या निमित्ताने पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये गुणानुक्रमे प्रथम गिरजा कद्रेकर (नववी), शीतल गोसावी (नववी), साहिल राऊळ (नववी), हर्ष राऊळ (सहावी), स्वरा हळदणकर (नववी) या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
क.म.शि.प्र. मंडळाचे संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र विभाग, नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल, वनविभाग सावंतवाडी आणि महाराष्ट्र जनक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्यावतीने व लक्ष्मीनारायण देवस्थान तसेच ग्रामपंचायत वालावल यांच्या सहकार्याने लक्ष्मीनारायण मंदिरात ''पाणथळ दिन'' कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या. यावेळी व्यासपीठावर वालावल सरपंच राजेश प्रभू, उपसरपंच साक्षी कवठणकर, एन.ए.एस.डी. विद्यालय ट्रस्ट वालावलचे अध्यक्ष जी. एम. उर्फ गोपाळ सामंत, वालावल हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण कोठावळे, लक्ष्मीनारायण देवस्थानचे सदस्य संदीप साळसकर, वालावल ग्रामपंचायत सदस्या पूर्वा आडेकर, समीक्षा गोवेकर, प्राची हळदणकर, यशश्री वालावलकर, राजू बंगे, माजी सरपंच नीलेश साळसकर आदी उपस्थित होते.
संदीप साळसकर यांनी लक्ष्मीनारायण तलावाचा इतिहास सांगितला. राजेश प्रभू यांनी पाणथळ दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. सामंत यांनी तलाव स्वच्छतेबाबतची विशेष चळवळ कथन करत स्वच्छतेबाबत उपस्थितांना आवाहन केले. मुख्याध्यापक कोठावळे यांनी पाणथळ जागेचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. सुरवसे यांनी सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
उद्घाटन सत्रानंतर पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे कुडाळ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पाणथळ जागा व प्राध्यापक डॉ. मंगेश जांबळे यांनी ''साप-समज, गैरसमज'' यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले. या अभ्याससत्राचे सूत्रसंचालन खुशी मूळये व कुणाल पाटकर यांनी केले. दुपारनंतरच्या मंदिर परिसरातील सत्रात पाणथळ संवाद साधण्यात आला. प्रश्न उत्तर कार्यक्रमाचे संचालन प्रकल्पप्रमुख प्रा. डॉ. योगेश कोळी व प्रवीण सावंत तसेच कुडाळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
वालावल विद्यालयाचे प्रिया प्रभू, गिरजा कद्रेकर, शीतल गोसावी, अमोलिका पुराणिक यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कुडाळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी मुळये हिने तलावाच्या संरक्षणासाठी विशेष मालवणी गाऱ्हाणे घातले. त्यानंतर प्रा. डॉ. योगेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेट व पक्षी निरीक्षण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क.म.शि. प्र मंडळाचे सहचिटणीस महेंद्र गवस, लक्ष्मीनारायण देवस्थानचे सदस्य गुरु देसाई यांनी विशेष सहकार्य केले. आकार फाउंडेशनचे गजानन कांदळगावकर यांनी विद्यार्थ्यांना टी-शर्ट पुरस्कृत केली. लक्ष्मीनारायण देवस्थानच्या वतीने अल्पोपहार व भोजन व्यवस्था करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.