कोकण

नेरुर येथील शिबिरात ९० जणांची चिकित्सा

CD

swt43.jpg
22033
नेरुर ः दंतमुख तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. सागर शर्मा, डॉ. श्रवण शेट्टी, उमेश गाळवणकर, अदिती पै व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

नेरुर येथील शिबिरात
९० जणांची चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः एशियन कॅन्सर फाउंडेशन, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या सहकार्याने मोफत दंतमुख तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिर नेरुर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले. यात एकूण ९० गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून एशियन कॅन्सर फाउंडेशनचे डॉ. सागर शर्मा (कर्करोग तज्ज्ञ), डॉ. श्रवण शेट्टी (कर्करोग तज्ज्ञ) उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शर्मा व डॉ. शेट्टी यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने आयोजित केलेले शिबिर स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. यावेळी बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालय प्राचार्या कल्पना भंडारी, वैशाली ओटवणेकर, प्रसाद कानडे, डॉ. ठाकूर, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते. प्रा. वैशाली ओटवणेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanaji Sawant Audio Clip: ''कोट-दोन कोट जाऊ द्या... व्हॉट्सअ‍ॅपला यादी टाका'', तानाजी सावंतांनी मतदानासाठी पैसे वाटले? क्लिप व्हायरल

ZP Elections 2026 Voting Live Update : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Bhiwandi Mayor: भिवंडीत भाजपमध्ये दुफळी! महापौरपदासाठी नारायण चौधरी यांची घोषणा; पण बॅनरबाजीवर चित्र वेगळंच

DEVKHEL REVIEW: १५ वर्षांची प्रथा, शंकासुराची शिक्षा अन् मृत्यूचं गूढ; कशी आहे अंकुश चौधरी प्राजक्ता माळीची 'देवखेळ' सीरिज

Pak vs Ned T20 World Cup : नेदरलँड्सने दिले कडवे आव्हान, पाकिस्तानला विजयासाठी घाम फुटला; कोलंबोच्या मैदानावर रोमांच रंगला

SCROLL FOR NEXT