कोकण

आंब्यावर अवकाळीच्या ''फोडणी''ची भीती0

CD

आंब्यावर अवकाळीची ‘फोडणी’ पडणार का?
उकाड्याची झळ; काजू, कोकमवरही संकट येण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः जिल्ह्याच्या किनारी भागात अचानक उकाड्यात वाढ झाली आहे. गारवा नाहीसा होऊन वातावरणातील उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे संभाव्य पावसाची लक्षणे मानली जात असून अवकाळी पाऊस झाल्यास आंबा, काजू तसेच अन्य फळ पिकांना धोका पोहोचू शकतो, असे मत बागायतदार व्यक्त करीत आहेत. आधीच आंबा उत्पादन घटलेले असताना त्यावर अवकाळीची ''फोडणी'' पडू नये, अशी अपेक्षा बागायतदार शेतकरी करीत आहेत.
गेले काही दिवस बदलत्या वातावरणाचा स्थानिक अनुभव घेत आहेत. मध्यंतरी पुन्हा थंडीचा जोर वाढला होता. किनारी भागात बोचरा वारा सुटला होता. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा पसरला होता. आता पुन्हा थंडी गायब होऊन वातावरणातील उष्णतेत वाढ झाल्याने पाऊस कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवकाळी पाऊस झाल्यास आंबा, काजू, कोकम तसेच अन्य पीक अडचणीत येण्याची बागायतदारांना भीती आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने किनारी भागात अवकाळी पाऊस झाल्यास नुकसानीचे ठरू शकते, असे मत आंबा बागायतदार व्यक्त करीत आहेत.
यंदा आंबा पीक सुरुवातीपासूनच अडचणीत असल्याने आता अवकाळी पाऊस झाल्यास नुकसानीची तीव्रता वाढू शकते, असेही सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi Statement : ''भारतात मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही'' ; ओवेसींचं मोठं विधान!

Sunetra Pawar: ''शपथविधीचा निर्णय पवार कुटुंबाचाच'', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मोठं विधान; पटेल, तटकरेंचा दोष नाही?

TET Exam Update: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘टीईटी’साठी मिळणार अधिक संधी; शासन बदलणार जीआर

ZP Elections 2026 Voting Live Update : बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केले

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

SCROLL FOR NEXT