कोकण

टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धा

CD

टपाल विभागातर्फे
पत्रलेखन स्पर्धा
रत्नागिरी ः भारतीय टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत’ हा विषय आहे. ज्या मुलांचे वय ५ मे २०२६ ला १५ वर्षापेक्षा जास्त नाही अशी मुले स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. पत्रलेखन मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतच करावे. लिहिण्यात येणारा संदेश पत्राच्या स्वरूपात असावा व शब्दसंख्या ८००पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले असावे. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी आहे. ही स्पर्धा ८ मार्चला सकाळी १० ते ११ या वेळेत होईल. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना सर्कल स्तरावर प्रथम बक्षीस २५ हजार रुपये, द्वितीय १० हजार रु., तृतीय ५ हजार रु. व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. पहिल्या तीन क्रमांकाना राष्ट्रीय स्तरावर प्रथम बक्षीस ५० हजार रु., द्वितीय २५ हजार रु., तृतीय १० हजार रु. व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेचे ठिकाण प्रत्येक शाळेला कळवण्यात येईल. सर्कल स्तरावरील ३ बक्षीसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठवली जाणार आहेत आणि त्यानंतर येथे पुन्हा नंबर काढण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.

गजानन महाराज प्रकट
दिन देवरूखमध्ये
देवरूख ः देवरूख येथील गणेश वेदपाठ शाळेत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने ८ फेब्रुवारीला हर्षदबुवा जोगळेकर यांचे कीर्तन सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. कीर्तनाला तबलासाथ केदार लिंगायत आणि हार्मोनियमसाथ हेमंत देशमुख करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच समाप्तीनंतर खिचडी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

शेख पिरवली बाबांचा
नेवरेत आज उरूस
रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे येथील शेख पिरवली बाबांचा उरूस गुरूवारी (ता. ५) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रात्री २ वा. संदल व गिलाफ मिरवणूक बाजारपेठ-मुस्लिमवाडी ते शेख पिरवली दर्ग्यापर्यंत काढण्यात येणार आहे. रात्री १२ वाजता दर्ग्यात ग्यारवी शरीपचा कार्यक्रम होईल. ६ला दुपारी शेख पिरवली दर्गा प्रांगणात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता नंगडेपीर व हसनपी बाबांच्या उरूसानिमित्त बाजारपेठ येथून मानकऱ्यांच्या घरापासून दर्गापर्यंत संदल व गिलाफ मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री दोन्ही दर्ग्यात ग्यारवी शरीफचा कार्यक्रम होईल. ७ला सकाळी १० वा. उत्कर्ष मंडळ येथे शेख पिरवली बाबा उरूस कमिटीतर्फे रक्तदाब शिबिर आयोजित केले आहे. दुपारी १२ वा. हसनपीर बाबा, दर्गा परिसरात नियाज, सायंकाळी ७ वा. संदल व गिलाफ मिरवणूक, रात्री कव्वालीचा कार्यक्रम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Policy : ऑनलाइन फसवणुकीत तुमच्या पैशांचे नुकसान झाले? घाबरू नका, RBI देणार ₹25,000 पर्यंत भरपाई! काय आहे मोठा निर्णय?

आणि भरत जाधवमुळे मकरंद अनासपुरेंनी मिशी काढली.... 'साडे माडे तीन'च्या वेळेचा न ऐकलेला किस्सा

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

अशोक सराफांची 'प्रियतमा' जगतेय हलाखीत आयुष्य ! कशी झाली 'ही' अवस्था जाणून घ्या

Leopard Attack Sangli : 6 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद; पिंजऱ्यात कैद करुन वन विभागाने कुठे नेले त्याला...

SCROLL FOR NEXT