कोकण

निवडणुका व आंगणेवाडीसाठी जादा फेऱ्या सोडा

CD

आंगणेवाडीसाठी जादा फेऱ्या सोडा
कोकण विकास समिती; रेल्वेमार्गावर होणार गर्दी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ ः शनिवारी (ता.७) होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्यानंतर सोमवारी (ता.९) भरणारी कोकणची काशी ‘आंगणेवाडी’ जत्रा या दुहेरी कारणांसाठी कोकणात मुंबईहून येणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. हा संभाव्य ताण लक्षात घेऊन मुंबई, पुणे ते कोकणदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, अशी आग्रही मागणी कोकण विकास समितीने केली आहे.
दरवर्षी आंगणेवाडी जत्रेसाठी लाखो भाविक कोकणात दाखल होतात. यंदा त्यात निवडणुकांची भर पडली आहे. त्यामुळे ६ ते १० फेब्रुवारी या कालावधीत मतदार, निवडणूक कर्मचारी, सुरक्षायंत्रणा आणि भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. सध्याच्या नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण आधीच पूर्ण झाले असल्याने या अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करणे कठीण होणार आहे. कोकण विकास समितीच्या शहरी व ग्रामीण विभागातर्फे रेल्वे प्रशासनाला सादर केलेल्या प्रस्तावात विशेष फेऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यात सीएसएमटी ते चिपळूण, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड, सीएसएमटी ते रत्नागिरी, पुणे ते सावंतवाडी रोड या गाड्यांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मतदानासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वेळेत पोहोचता यावे तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, हा या मागणीमागचा मुख्य उद्देश आहे.
----
तातडीने नियोजन करावे
वेळेचे नियोजन पाहता रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करावी, अशी मागणी समितीचे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

SCROLL FOR NEXT