कोकण

आवाशीतील ओव्हरब्रिज कामाचा प्रवाशांना फटका

CD

ओव्हरब्रिज कामाचा प्रवाशांना फटका
आवाशी–गुणदेफाट्यावर एसटीचा थांबा वगळला
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी-गुणदेफाटा येथे चौपदरीकरणानंतर सुरू करण्यात आलेल्या ओव्हरब्रिजच्या कामाचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एसटी बसेस येथे न थांबताच पुढे निघून जात असल्याने प्रवाशांना थांब्यावर तिष्ठत राहावे लागते.
आवाशी-गुणदेफाटा हे लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या अवजड व अतिअवजड वाहनांचे प्रमुख प्रवेशद्वार आहे तसेच आवाशी ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंपन्यांच्या कामगार बसेस, अधिकाऱ्यांची वाहने, खासगी वाहने तसेच खेड व चिपळूण आगारातून ये-जा करणाऱ्या एसटी बसेस याच मार्गावरून जातात. परिणामी, या ठिकाणी कायमच वर्दळ असते.
खेड व चिपळूण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, लवेल येथील उच्च माध्यमिक विद्यार्थी, औद्योगिक वसाहतीतील कामगार, रुग्ण व सामान्य प्रवासी यांच्यासाठी आवाशी-गुणदेफाटा येथेच प्रमुख बसथांबा आहे; मात्र ओव्हरब्रिजच्या कामामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्वेकडील मार्गाने सुरू असल्याने सायंकाळच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होते.
चिपळूण येथे महत्त्वाच्या कामासाठी जात असताना तब्बल एक तास एकाच ठिकाणी अडकून राहावे लागले. या वेळी खेडच्या दिशेने येणाऱ्या अनेक एसटी बसेस न थांबताच पुढे निघून गेल्या, अशी प्रतिक्रिया माजी सभापती अरविंद आंब्रे यांनी दिली. या वाहतूक कोंडीवर वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा व सुरक्षित बस थांबा उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC : इशान किशनचा रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध 'तोडफोड' फटकेबाजी, मोडला गौतम गंभीरचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रम

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

Ishan Kishan : ईशान किशन लवकरच विवाहबंधनात? आजोबांनी दिले संकेत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

Dharashiv Crime : कला केंद्राच्या छम छम मुळे पुन्हा एकाचा खुन; महाकाली कलाकेंद्राच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे जिल्हाप्रशासन हातबल

Horoscope Prediction : यंदाचा शिमगा 5 राशींना जाणार अत्यंत सुखात ! होळीपूर्वीच येणार सोन्याचे दिवस, पैशांची भरभराट

SCROLL FOR NEXT