swt413.jpg
22083
विलेपार्ले ः ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अप्पा परब यांना कोकण सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.
‘कोकण कट्टा सन्मान’
विलेपार्लेत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ : ‘कोकण कट्टा’ या संस्थेतर्फे ‘कोकण कट्टा सन्मान’ सोहळा विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. यावेळी कोकणचा समृद्ध वारसा जपणाऱ्या आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अप्पा परब, हर्षल मळेकर, पार्ले टिळक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका छाया गाडे, उद्योजक शेखर धारगळकर, कलाकार दीपन वर्तक, समाजसेवक महेश सावंत आणि संतोष परब यांना ‘कोकण सन्मान’ प्रदान करण्यात आला.
‘कोकण कट्टा’चे संस्थापक अजित पितळे, सेवाई संस्थेचे अध्यक्ष संदीप दळवी, रुग्णसेवक जितेंद्र जानावळे, ‘आर्य मेलडीज’चे संदीप पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा भगवान परशुरामाची मूर्ती, सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. यावेळी संदीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘यादों का कारवां’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. गायक श्रीकांत नारायण यांनी प्रेक्षकांना मोहून टाकले. यातून उभी राहिलेली रक्कम कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांसाठी दिली जाणार आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी मदतीचा धनादेश एका वाद्यवादकाला प्रदान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.