-rat४p११.jpg-
P२६O२२०८०
रत्नागिरी : सहकार वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये, श्रीकांत दुदगीकर, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, प्रा. विद्याधर केळकर, प्रा. महेश नाईक.
--------
अभ्यंकर महाविद्यालयाच्या
सहकार अंकाचे प्रकाशन
रत्नागिरी, ता. ५: अभ्यंकर -कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार या वार्षिक अंकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
सहकार अंकाच्या प्रमुख संपादिका प्रा. मानसी गानू यांनी अंकाचा आढावा घेताना सांगितले, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू या पाच भाषांमध्ये सहकारचे साहित्य यात आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे उत्तम लेख, कथा, कविता, पुस्तक परीक्षण असे सर्वस्पर्शी साहित्य आणि अतिशय विलोभनीय व सुंदर चित्रे यांचा समावेश यावर्षीच्या ‘सहकार’मध्ये करण्यात आला आहे. या वेळी संपादक मंडळ सदस्य प्रा. जलील हुश्ये, प्रा मकरंद दामले, प्रा. शिल्पा देसाई, प्रा. क्षमा पुनसकर आणि प्रा. अभिजित भिडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.