कोकण

शेतीसाठी आता ‘एआय’चे पाठबळ

CD

डिजिटल शेतीकडे शेतकऱ्यांचे पाऊल
शेतीसाठी आता ‘एआय’चे पाठबळ
कृषी विभागाचे ‘महाविस्तार एआय’ हे ॲप विकसित’ ; ४० हजार शेतकऱ्यांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः हवामान बदलाचे संकट, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि माहितीचा अभाव यांसारख्या आव्हानांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने नवे तंत्र उपलब्ध करून दिले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार एआय’ हे ॲप विकसित करण्यात आले असून, जिल्ह्यात या ॲपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४० हजार १६७ शेतकऱ्यांनी यावर नोंदणी करून आधुनिक शेतीकडे पाऊल टाकले आहे.
शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मार्गदर्शक ठरत आहे. यामध्ये रिअल टाइम हवामान अंदाजापासून ते खतांच्या वापरापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, यात असलेल्या ‘एआय चॅटबॉट’मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शंकांची उत्तरे तत्काळ मिळतात. या मध्ये पावसाचा अंदाज आणि शेतमालाचे दर दररोज अपडेट मिळतील. पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मदत होणार असून लागवडीच्या पद्धती, कीड नियंत्रण आणि मृदा आरोग्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला त्यावर मिळू शकतो. तसेच शासकीय योजनांची माहीती, विविध अनुदान, डीबीटी आणि पीकविमा योजना याची माहितीही तिथे मिळणार आहे. शेतमाल साठवणुकीबाबत तांत्रिक मार्गदर्शन त्यावर उपलब्ध आहे.
कृषी विभागाकडून या ॲपबाबत गावपातळीवर जनजागृती केली जात आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी माहितीसंपन्न होऊन शेती करावी, यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गुगल प्ले स्टोअर जाऊन आजच महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
------
चौकट १
‘एआय’ चॅटबॉटचे आकर्षण
कृषि विभागाकडून तयार केलेल्या ॲपचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘एआय चॅटबॉट’. शेतकरी आपल्या भाषेत प्रश्न विचारू शकतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे त्यांना शास्त्रीय माहितीच्या आधारे त्वरित उत्तर मिळते. यामुळे कृषी तज्ज्ञांची प्रतीक्षा करण्याची गरज उरलेली नाही.
-------
चौकट २
तालुका* झालेली नोंदणी
रत्नागिरी* ६७९०
राजापूर* ३९०७
लांजा* ४८८६
चिपळूण* ६१५०
संगमेश्वर* ३९३६
खेड* २०११
गुहागर* ४३९६
दापोली* ४५०१
मंडणगड* ३५९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Central Railway: मध्य रेल्वेची मोठी कारवाई! तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या १६ लाख प्रवाशांना दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Onion Price Cras : आखातातील युद्ध ठरणार शेतकऱ्यांसाठी काळ? निर्यातीला ब्रेक लागल्याने कांद्याचे दर मातीमोल

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

SCROLL FOR NEXT