कोकण

कणकवली : कदम पारितोषिक

CD

फोटो : kan52.jpg
O22214
किशोर कदम


कवी किशोर कदम यांना
काव्यस्पर्धेत पारितोषिक
मुंबई काव्य मालाड संस्थेतर्फे गौरव
कणकवली, ता. ५ : सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा ओसरगाव शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक कवी किशोर कदम यांना मुंबई मालाड येथील काव्य मालाड या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. १५०० रुपये आणि स्मृतिचिन्ह, शाल असे पारितोषिकाचे स्वरूप असून कवी कदम यांच्या बाप कवितेचा या पारितोषिकाने गौरव करण्यात आला आहे.
काव्य मालाड ही साहित्यिक संस्था गेली अनेक वर्ष राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करते. यावर्षीच्या काव्य स्पर्धेत ६५ कवीनी सहभाग घेतला होता.यात किशोर कदम यांच्या ''बाप '' या कवितेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. किशोर कदम हे सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीत सक्रिय कार्यरत असून नव्या लेखक कवीना मंच उपलब्ध व्हावा म्हणून सम्यक संबोधी साहित्य संस्था त्यांनी चालू केली आहे. त्याचबरोबर या संस्थेतर्फे दरवर्षी एकदिवसीय साहित्य संमेलन ते आयोजित करत असून बाबुराव बागुल आणि नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ त्यांनी राज्यस्तरीय काव्य स्पर्धाही या संस्थेतर्फे चालू केली आहे. सम्यक संबोधी हा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार ते दरवर्षी देत असतात. त्यांचा एक बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखमाला हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या राज्यस्तरीय पारितोषिकाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य संस्कृती चळवळीतून किशोर कदम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Valentines Week 2026 Calendar: रोझ डे ते किस डे...प्रेमाचा आठवडा होतोय सुरू! कोणत्या दिवशी कोणता 'डे'? नोट करा संपूर्ण कॅलेंडर

तुमची मुलं फोनवर Adult Content तर पाहत नाही ना? कसा कराल कंट्रोल?

‘धुरंधर’च्या सेटवर रणवीर सिंगसाठी खरंच तीन व्हॅनिटी होत्या? अखेर चर्चांना पूर्णविराम, रेडिटच्या दाव्याचं सत्य काय?

T20 World Cup: 'भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय सरकारचा, आमच्या हातात...' पाकिस्तानचा कर्णधार काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT