22215
भालचंद्र महाराज विद्यालयात
कर्करोग दिनानिमित्त जागृती
कणकवली, ता. ५ : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शहरातील भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्रमांक ३ येथेे कर्करोग व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात आली. नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर, मुख्याध्यापिका अक्षया राणे, श्रीमती प्रतिभा कोतवाल, निवृत्ती गुरव, संतोष घाडीगावकर, महेश पाटील, संजय तांबे, सुरेखा सावंत, रुपाली डोईफोडे, अश्विनी साटम, अर्चना राऊत उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. तसेच शरीरावर विविध घातक दुष्परिणाम होतात, अशी जागृती पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आली. समाजात तंबाखू सेवनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापिका अक्षया राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना व्यसनमुक्त करण्यासाठी ‘व्यसनमुक्त शाळा दत्तक’ अभियान राबवावे, अशी मागणी नशाबंदी मंडळाकडे केली. सर्वांनी तंबाखूमुक्तीचा सामूहिक संकल्प घेत समाजाला आरोग्यदायी व व्यसनमुक्त बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.