कोकण

१८ कोटी

CD

‘महात्मा फुले योजने’चे १८ कोटी थकीत
रत्नागिरी जिल्ह्याची स्थिती; अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आशा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा जुलै महिन्यापासून सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांना मिळाला नव्हता. त्यामुळे निधीसाठी रुग्णालये प्रतीक्षेत आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याची थकबाकी १८ कोटींची आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी १ हजार १६२ कोटी मंजूर झाले असून, त्यातून रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळेल, अशी आशा निर्माण झालेली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांचे दावे निकाली काढण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार, १ हजार १६२ कोटी ८ लाख ६३ हजार ३२१ रुपयेइतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दरवर्षी हजारो रुग्ण या योजनेतून उपचार घेतात. या योजनेतून सरकारच्यावतीने खासगी, सार्वजनिक रुग्णालयांना उपचारांचा परतावा मिळत असतो. मागील जुलै महिन्यापासून हा परतावा मिळालेला नव्हता. जिल्ह्यासह राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांनी कोट्यवधी रुपये थकल्याच्या तक्रारी वाढत होत्या. समन्वयाकडे संपर्क करूनही तोडगा निघाला नव्हता. या योजनेचा परतावा ४५ दिवसांच्या आत मिळत नसल्यामुळे या योजनेंतर्गत उपचार करण्याबाबत खासगी रुग्णालयांकडून नकारात्मक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले योजना निधीच्या टंचाईत अडकली असल्यामुळे खासगी रुग्णालये निधीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT