- rat५p१५.jpg-
२६O२२२५९
राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या दामले विद्यालयाच्या ‘काय ते जुनं’ या नाटकातील एक क्षण.
---
दामले विद्यालयाचे बालनाट्य अंतिम फेरीत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत रत्नागिरीतील नगर परिषद शाळा क्र. १५, दामले विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. या केंद्रावर सादर झालेल्या तब्बल ४९ बालनाट्यांमधून दामले विद्यालयाच्या ‘काय ते जुनं’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावत अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे. या नाटकाचे दिग्दर्शक शाहबाज गोलंदाज आणि नेपथ्यकार निरंजन सागवेकर हे दोघेही दामले विद्यालयाचेच माजी विद्यार्थी आहेत तर नाटकाचे लेखन विद्यालयाचे शिक्षक योगेश कदम यांनी केले आहे. गुणवत्ता प्रमाणपत्र विजेता अर्णव सरपोतदार याने यापूर्वीही ‘सावित्रीची लेक’ या नाटकासाठी अभिनयाचे पारितोषिक मिळवले आहे. या यशाबद्दल नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद संसारे, नाटकाचे निर्मितीप्रमुख व मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी सर्व बालकलाकार आणि तंत्रज्ञांचे विशेष अभिनंदन केले आहे.
-----
चौकट
वैयक्तिक पारितोषिकांची लयलूट
या नाटकाला वैयक्तिक विभागांतही तीन महत्त्वाची पारितोषिके मिळाली आहेत. त्यात दिग्दर्शन-शाहबाज गोलंदाज (द्वितीय क्रमांक), नेपथ्य- निरंजन सागवेकर (द्वितीय क्रमांक) व अभिनयासाठी अर्णव सरपोतदार (गुणवत्ता प्रमाणपत्र) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.