ग्राफिक्स पध्दतीने वापरणे
- rat५p१३.jpg -
P२६O२२२५७
चिपळूण ः कुंभार्ली घाटातील वळणावरचे रस्ते चक्क वाहून गेले आहेत. वाहनचालकांना खडीमातीच्या रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.
- rat५p१४.jpg -
२६O२२२५८
घाटातील वळणावर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत.
-------
कुंभार्ली घाटातील रस्त्यांचे ‘तीनतेरा’
वाहतुकीत अडथळा; नऊ महिने प्रवाशांच्या नशिबी खड्डेच, अपघाताचे वाढले धोके
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : कुंभार्ली घाटातील एकदा केलेला रस्ता तीन महिन्यापेक्षा जास्त काळ टिकत नाही. पावसाळा संपला तरी अजून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस दुरुस्ती सुरू होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांना आहे. मार्चअखेरीस रस्ते दुरुस्त होतील आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला की, घाटातील रस्ता पुन्हा खराब होईल. हे चक्र कायम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना नऊ महिने खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. सद्यःस्थितीत घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकाच सुरू आहे.
कुंभार्ली घाटातून अवजड मालवाहतूक वाढलेली आहे. १६ ते ३२ चाकी ट्रक या रस्त्यातून प्रवास करतात. या ट्रकची चाके वळणावर घासली जातात त्यामुळे खड्डे पडतात. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटार नसल्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबून डांबर आणि खडी ठिसूळ होते. रस्तेदुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात दोन-तीन प्रकारचे डांबराचे थर धरले जाते. प्रत्यक्षात काम करताना डांबराचा एकच थर मारला जातो आणि समजूत काढली जाते असा नागरिकांचा आरोप आहे. घाटातील नाल्यांमध्ये दरडींची कोसळलेली माती अजूनही बाहेर काढण्यात आलेली नाही. अतिपाऊस व संततधारेमुळे खडी व डांबर यांची पकड सैल होऊन माती वर येते. त्यामुळे खड्डे वाढत आहेत.
घाटातील रस्तेदुरुस्तीचा विषय आता प्रवाशांच्या जिवावर बेतू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत या घाटातील रस्त्यांवर सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे; मात्र हा खर्च केवळ तीन महिन्यांचाच दिलासा ठरत आहे. दरवर्षी पावसाळा आला की, घाटातील बारा वळणांवरील रस्ता पूर्णपणे वाहून जातो ज्यामुळे दुरुस्तीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जानेवारी महिन्यातच या घाटात सात लहान-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळा संपून अनेक महिने उलटले तरी दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. मार्चमध्ये काम सुरू करायचे आणि जूनच्या पावसात ते वाहून जायचे, हे चक्र कायम असून हा जनतेच्या पैशांचा निव्वळ अपव्यय ठरत आहे. सुरक्षित प्रवासासाठी घाटात कायमस्वरूपी आणि दर्जेदार उपाययोजना करण्याची मागणी आता वाहनचालकांमधून जोर धरत आहे.
घाटातील खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर रस्त्याची जी खडी बाहेर पडलेली आहे त्यात लहान आकाराचे दगडगोटे आहेत. त्यामुळे डांबर एकसंध होत नाही. अनेक ठिकाणी खडीऐवजी नदीतील लहान आकाराचे दगडगोटे वापरले जातात. कुंभार्ली घाटपरिसरातील माती भुसभुशीत आहे. खड्डे भरताना ती कडक करण्यासाठी प्रथम त्यावर खडी व मुरूम टाकून त्यावर पाणी मारून वारंवार रोलर फिरवून ती जागा कडक करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यावर डांबरीकरण केले पाहिजे. प्रत्यक्षात ही पद्धत वापरली जात नाही. त्यानंतर लगेचच वाहतूक सुरू झाल्यामुळे रस्ता अधिक काळ टिकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
------
चौकट
खड्डे का पडतात?
शास्त्रीय पद्धतीने रस्तेदुरुस्ती केली जात नसल्याने खड्डे पुन्हा पडतात. खड्डे भरताना डांबरमिश्रित खडी खड्ड्यात ओततात. खड्डे भरण्यासाठी एकाच प्रकारची, आकाराची खडी वापरली जाते. खड्डा भरण्यापूर्वी खड्ड्याच्या आजूबाजूला खोदाई केली जात नाही किंवा साफसफाईही होत नाही. खड्डा तसेच बुजवल्यानंतर त्याचा तत्काळ वापर सुरू होतो आणि त्यामुळे पुन्हा खड्डा तयार होतो.
---
चौकट
खड्डे बुजवणारे यंत्राची गरज
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘स्पॉट व्होल्ड फिलिंग मशिन’ अर्थात खड्डे बुजवणाऱ्या यंत्राचा उपयोग झाला तर ते अधिक टिकावू होतील. योग्य तापमानावेळी या यंत्रात डांबर आणि अन्य माल टाकून खड्डे बुजवले जातात. पावसाळ्यात मात्र या यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. यंत्राद्वारे खड्डा बुजवताना आधी तो थोडा खोल केला जातो. त्यानंतर सामान्य वातावरणात खड्ड्यांमध्ये मटेरिअल टाकून ते दाबले जाते. त्यानंतर तासाभरात तो रस्ता वापरण्यासाठी तयार होतो. स्पॉट व्होल्ड फिलिंग मशिन असेल अशाच मक्तेदाराला दुरुस्तीचे काम दिले पाहिजे.
----
कोट १
रस्ता तयार करताना पॅचअप् योग्य प्रकारे झाले पाहिजे. डांबर व खडीचे मिश्रणही योग्य प्रमाणात असल्यास रस्ते दीर्घकाळ टिकतात. पाया मजबूत नसल्यामुळे रस्ते अधिक दिवस टिकत नाहीत.
- प्रा. संतोष चव्हाण, स्थापत्य अभियंता
----
कोट २
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्याची दुरुस्ती आम्ही केली आहे. ठेकेदाराने निकृष्ट काम केले तरी आम्ही त्याच्याकडून पुन्हा काम करून घेत आहोत. त्याला माफी देत नाही. उर्वरित रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला आहे तेथे आम्हाला खर्च करता येत नाही.
- अरुण मुलाजकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण
----
दृष्टिक्षेपात...
* अपघातांची मालिका सुरूच
* रस्तेदुरुस्तीची पद्धतच चुकीची
* लाखोंच्या खर्चातून तीन महिन्यांचा दिलासा
* रस्तेदुरुस्तीवर पाच वर्षात दहा कोटींचा खर्च
* १२ वळणांवर रस्ताच वाहून गेला
* जानेवारी महिन्यात सात लहान-मोठे अपघात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.