कोकण

जेसीआय फेस्टिव्हल २०२६ चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न

CD

- rat५p१६.jpg-
२६O२२२६६
खेड ः रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने मनिता मनोज धोत्रे यांना जेसीआयकडून घरघंटी प्रदान करण्यात आली. या वेळी डावीकडून मधुर पेठे, उद्योजक विलास बुटाला, श्रेया कदम, नगराध्यक्ष बुटाला, जेसीजचे अध्यक्ष अमित नामुष्टे, अमर दळवी व जावेद कौचाली.
----
‘जेसीआय फेस्टिव्हल’ला प्रारंभ
खेडमध्ये मनोरंजाचे कार्यक्रम ; महिलेला घरघंटी भेट
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ ः जेसीआय खेड आयोजित ‘जेसीआय फेस्टिव्हल २०२६’ चे उद्‍घाटन श्रेया कदम यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात पार पडले. मनोरंजनासोबतच सामाजिक कार्याचा वसा जपत या सोहळ्याने खेडकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपताना निळवणे येथील मनिता मनोज धोत्रे यांना उदरनिर्वाहासाठी घरघंटी प्रदान करण्यात आली.
जेसीआय फेस्टिव्हलच्या सुरुवातीला एलटीटी स्कूल, ज्ञानदीप भाडगाव, ज्ञानदीप मोरवंडे-बोरज आणि ओम साई ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्ये सादर केली. विद्यार्थ्यांच्या या दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या प्रसंगी नगराध्यक्ष माधवी बुटाला ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून तर उद्योजक विलास बुटाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. माजी विभागीय अध्यक्ष जेसी अमोल क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. या फेस्टिव्हलमुळे खेड शहरात सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी धोत्रे यांना उदरनिर्वाहासाठी श्रेया कदम यांच्या हस्ते घरघंटी प्रदान करण्यात आली. जेसीआय खेडच्या या माणुसकीपूर्ण उपक्रमाचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
दरम्यान, फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी खेड शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफएम अमित नामुष्टे म्हणाले, पुढील पाच दिवस हा फेस्टिव्हल सुरू राहणार असून यात विविध मनोरंजनात्मक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT