- ratchl५२.jpg ः
२६O२२३०३
चिपळूण - वालोपेतील सभेत बोलताना प्रशांत यादव.
----
विकासाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचवा
प्रशांत यादव ः वालोपे येथे युतीची प्रचार सभा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः तालुक्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने विकासाचा संकल्प सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवावा. या निमित्ताने युतीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन भाजप नेते प्रशांत यादव यांनी केले.
भाजप-शिवसेना-रिपाइं (आठवले) युतीच्या वालोपे येथील सभेत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी युती सरकारच्या माध्यमातून राज्यात व कोकणात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत ही निवडणूक विकास आणि स्थैर्याच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगितले. युतीचे अधिकृत उमेदवार विकासाभिमुख असून, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आहेत. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला उमेदवार दीप्ती दीपक महाडिक, संदेश मनोहर आयरे यांच्यासह भाजपाचे उपतालुकाप्रमुख समीर पवार, माजी सरपंच रवींद्र आयरे, उपसरपंच प्रणीत गुरव, विभागप्रमुख अजय कदम, संदीप तांबिटकर, दिलीप चव्हाण, अमर शिरकर, बावा महाडीक, जनार्दन मालवणकर, विलास सावसरे, सुरज पडवेकर, जयदीप जोशी, विलास पवार यांच्यासह युतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.