कोकण

आंबा बागायतदारांसाठी ''शाश्वत आंबा उत्पादन'' कार्यशाळेचे आयोजन

CD

रत्नागिरीत मंगळवारी
‘शाश्वत आंबा उत्पादन’ कार्यशाळा

​रत्नागिरी, ता. ५ : कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे उत्पादन शाश्वत आणि दर्जेदार व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे विशेष माहितीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवारी (ता. १०) सकाळी १० वा. मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये होणार आहे.
कार्यशाळेत आंबा बागायतदारांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ​पहिले सत्र ठिबक सिंचन-काळाची गरज शाश्वत आंबा उत्पादनासाठी ठिबक सिंचन व्यवस्थेचे महत्त्व आणि त्याचे तांत्रिक मार्गदर्शन जैन इरिगेशन (जळगाव)चे तज्ज्ञ गाडेकर करणार आहेत. पाणी व्यवस्थापनातून उत्पादकता कशी वाढवता येईल, यावर ते प्रकाश टाकतील. दुसऱ्या सत्रात शासकीय सबसिडी व योजना बागायतदारांना ठिबक सिंचन बसवण्यासाठी मिळणाऱ्या शासकीय सबसिडी आणि इतर सवलतींबाबत जिल्हा कृषी अधिकारी सदाफुले सविस्तर मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमाची सांगता दुपारच्या जेवणानंतर होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक टी. एस. घवाळी, मंदार सरपोतदार आणि प्रसन्न पेठे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा बागायतदारांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT