मालवण येथे २२ पासून
लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा
मालवणः येथील स्पोर्टस् क्लबच्यावतीने ‘मालवण प्रीमियर लीग २०२६’ या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत बोर्डिंग ग्राउंड, मालवण येथे होणार आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५५,००० रुपये व चषक, द्वितीय रोख रक्कम ३३,००० व चषक अशी बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ८ संघांना प्राधान्य देण्यात येणार असून सर्व संघांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपला संघ निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांकडून केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुशील शेडगे, ज्ञानेश केळुसकर यांच्याशी संपर्क साधावा.
.........................
सांगेली नवोदय विद्यालयात
रिक्त जागांसाठी प्रवेश
सावंतवाडीः शिक्षण मंत्रालय- भारत सरकारद्वारे संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी इ. ९ वी आणि ११ वीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी होणारी परीक्षा उद्या (ता. ७) सकाळी ११.१५ ते १.४५ यावेळेत पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग, सांगेली, ता. सावंतवाडी येथे होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वा. हजर राहणे आवश्यक आहे.
........................
मळेवाड येथे उद्या
धार्मिक कार्यक्रम
मळेवाड ः मळेवाड-हेदुलवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिनानिमित्त ८ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ८ ला सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा, पंचामृत महाअभिषेक आणि महाराजांची महापूजा, ९.३० ते १२ वाजता राम हृदयस्रोत अनुष्ठान, दुपारी १२.३० ते १ वा. पर्यत महाराजांची महाआरती प्रकट समय, दुपारी १ ते ३ पर्यत महाप्रसाद, दुपारी २ ते ५ पर्यत गायन आणि भजनाचा कार्यक्रम ‘संगीत स्वररजनी’, सायंकाळी ५ ते ६.३० पर्यंत ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळे यांचा भजनाचा कार्यक्रम, रात्री ७ वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा, रात्री ८.३० वाजता महाआरती, रात्री ९.३० वाजता रेन्बो फेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत लेखक वैभव परब व दिग्दर्शक रुपेश कवठणकर यांचे दोन अंकी विनोदी नाटक ‘आलाय मोठा शहाणा’ नाट्यप्रयोग होणार आहे.
..
न्हिवे येथे १४ ला
धार्मिक कार्यक्रम
मालवणः श्री ब्राम्हण देवालय, न्हिवे येथील श्री ब्राम्हणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३१ वा वर्धापनदिन १४ ला भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. १३ ला सकाळी ७.३० ते १.३० या वेळेत नवचंडी याग होणार असून रात्री ९ वा. गवळदेव समई नृत्य, बोर्डवे यांचा समईनृत्य, १४ ला दुपारी ४ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्री ९ वा. गुणवंत सत्कार, रात्री ९.३० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार ‘व्यंकटरमणा जय गोविंदा’ हे नाटक होणार आहे.
.....................
कणकवलीत ११ पासून
योगोपचार शिबीर
कणकवलीः जिल्हा पतजंली योगपरिवार, कणकवली नगरपंचायत सहकार्याने कणकवली कॉलेजच्या मैदानात ११ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये योगोपचार, मुद्रा, आहार, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद, होमहवन चिकित्सा, आदर्श जीवन कौशल्य आदी गोष्टी शिकविण्यात येणार आहे. हे शिबीर रोज सकाळी ५.३० ते ७ या वेळेत घेण्यात येणार आहे. शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
....................
शिरोडा येथे ११ ला
जत्रोत्सवाचे आयोजन
शिरोडाः तिरोडा (ता. सावंतवाडी) गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिर वाढदिवस जत्रोत्सव ११ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, केळी ठेवणे, ओटी भरणे, रात्री दारूसामान, पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.