कोकण

धाडस बाळगले, तर यशाचा मार्ग सुखकारक

CD

-rat७p३१.jpg-
२६O२२७०४
दापोली ः डॉ. सतीश वाघ यांना त्यांचीच प्रतिमा असलेले स्केचिंग देताना श्रीराम साळुंखे, एन. वाय. पवार.
------
धाडसातूनच यशाचा मार्ग सुखकारक
डॉ. सतीश वाघ ः बुटाला हायस्कूलमध्ये नूतन सभागृहाचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ७ ः आयुष्यात जे आपले नाही त्याची उगाच अपेक्षा न करता ते समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ते देऊन टाका. त्याग करण्याची वृत्ती आणि संकटांना सामोरे जाण्याचे धाडस अंगी बाळगले तरच यशाचा मार्ग सुखकारक होतो, असे प्रतिपादन ‘सुप्रिया लाईफ सायन्स’चे अध्यक्ष तथा वाघ फाउंडेशनचे प्रमुख डॉ. सतीश वाघ यांनी केले.
दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल येथील नूतन सभागृहाचे उद्‍घाटन झाले. त्या वेळी डॉ. वाघ बोलत होते. ट्रक ते मर्सिडीज बेंझचा संघर्षमयी प्रवास आपल्या यशोगाथेचा उलगडा करताना ते म्हणाले, केवळ ३५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेला व्यवसाय आज कोटींच्या घरात पोहोचला आहे. हा प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालेला सत्कार आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी केलेले कौतुक हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत.
या प्रसंगी हायस्कूल, पंचक्रोशी स्कूल कमिटी आणि १९९१-९२ च्या बॅचतर्फे डॉ. वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे यांनी डॉ. वाघ यांच्या दातृत्वाचे कौतुक केले आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या वेळी संदीप जोशी, संस्थेचे आजीव सेवक भोजकर, मुख्याध्यापिका भक्ती सावंत, गावतळे सरपंच विधी पवार, रूखी सरपंच संदीप मांडवकर, भरत दाभोळकर, वसंत पवार, विशाल म्हबदी, दशरथ पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी १९९१-९२ ची माजी विद्यार्थी बॅच, परिवहन समिती आणि महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT