कोकण

महामार्गावर पाच ठिकाणी वाहनचालकांना अडथळा

CD

rat8p11.jpg
22895
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे सुरू असलेले काम.

महामार्गावर पाच ठिकाणी वाहनचालकांना अडथळा
मुंबई-गोवा प्रवास ; मार्चनंतर प्रवास सुसाट होण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्ग अजूनही प्रगतीपथावरच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते रत्नागिरी हा प्रवास सहा तासांचा असला, तरी माणगाव बायपास, चिपळूण, संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील कामांचा अडथळा प्रवाशांना पार करावा लागतो. त्यामुळे काहीवेळा वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. अन्यथा पर्यटकांची गाडी महामार्गावरून सुसाट जाऊ शकते, अशी स्थिती आहे.
मुंबईहून मोठ्याप्रमाणात कोकणकर आंगणेवाडी यात्रेसाठी सिंधुदुर्गकडे रवाना होत आहेत. त्यांचा मुंबईहून निघाल्यानंतरचा प्रवास थोडी खुशी, थोडा गम असाच आहे. गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवासाचा सामना कोकणात येणाऱ्यांना करावा लागत आहे. यंदा काही ठिकाणी एक मार्गिका तर काही भागात रस्ता पूर्ण झालेला आहे. त्यामुळे तेवढा त्रास पर्यटकांसह कोकणकरांना झालेला नाही. चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम काही प्रमाणात रखडलेले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तत्पुर्वी माणगाव बायपास येथील अडथळा पार करण्याचे आव्हान असते. चिपळूण आणि संगमेश्वर यांसारख्या महत्त्वाच्या गावांमधून प्रवास करताना रस्त्याच्या कामांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. चिपळूण ते रत्नागिरी या टप्प्यात अजूनही अपेक्षित वेग गाठता येत नाही. त्यातही चिपळूण ते संगमेश्वर प्रवास सुरळीत होतो. मात्र आरवली ते कांटे दरम्यान अडथळ्यांच शर्यत सुरू होते. या टप्प्यात ३९.२४ किमीपैकी ३६.८० किमीचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम पूर्ण व्हायला मार्च उजाडेल अशी स्थिती आहे. कांटे ते वाकेड दरम्यान ४९.१५ किमी अंतरापैकी ४४.२२९ किमी काम पूर्ण झाले आहे. वाकेडपासून पुढील झारापपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
रत्नागिरीकडे येताना हातखंबा सोडल्यानंतर पाली परिसरात पुलांच्या कामांमुळे थोडा वेळ जातो. तसेच वेरळ घाटातही प्रवासात वारंवार अडथळे येत आहेत. महामार्गावरील विशिष्ट कालावधीत वाढणारी वाहनांची संख्या कोंडीत अधिकच भर टाकते. लांजा शहरातही काही प्रमाणात वाहतूक धीम्या गतीने चालते; मात्र लांजा सोडल्यानंतर पुढे कसालपर्यंतचा रस्ता सुस्थितीत असल्याने तिथे वाहने सुसाट धावत आहेत. या टप्प्यातील प्रवासात प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान, महामार्गाचे काम गेली १८ वर्षे रखडल्याने, गणपती असो, शिमगा असो चाकरमानी पर्यायी कोल्हापूर मार्गाचा अवलंब करतात. आता रस्त्याच्या कामात थोडी प्रगती आहे. चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. उड्डाणपूल वगळता रखडलेली कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग विभागाला आहे.

कोट
पनवेलवरून रत्नागिरी येताना अनेकठिकाणी उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. तिथे डायव्हर्शन असल्याने वेग कमी होतो. त्याचा प्रवासात त्रास होतो. काही महत्वाच्या ठिकाणी जास्त कालावधी लागतो. तसेच तिथे ठराविक कालावधीत वाहतूक कोंडी होत असल्याने गोंधळ होतो. माणगाव बायपासचे काम रेंगाळलेले आहे. लांजा शहरातून पुढे गेल्यानंतर कसालपर्यंत पर्यंत वाहने सुसाट चालवता येतात.
- गुरूप्रसाद सावंत, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

"आई आगीत होरपळलेली आणि मला लीड रोल मिळाल्याचा फोन आला" शुभविवाह फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Dhule Bus Stand : धुळ्यातील एसटी प्रवासाचा कायापालट! चार स्थानकांचा 'एअरपोर्ट' सारखा विकास, ९० नवीन बसेस दाखल

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

SCROLL FOR NEXT