22914
शेखर बांदेकर यांना
‘इंडियन आयकॉन’
बांदा ः ज्ञान उदय फाउंडेशन राजस्थान यांच्यामार्फत देशभरातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन योगवर्ग या विभागातून येथील योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड २०२६’ देऊन गौरविण्यात आले. बांदेकर हे सिंधुदुर्गमध्ये फिटनेस योग ॲकॅडमीच्या माध्यमातून योगाभ्यासाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. तसेच ऑनलाईन स्वरुपातून देशभर निःशुल्क योग वर्ग देखील घेत आहेत. ऑनलाईन स्वरुपामध्ये सिंधुदुर्गसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान, नागपूर, अक्कलकोट तसेच अमेरिकेमधून देखील योगाभ्यासप्रेमी योगसाधक नियमित योगाभ्यास करीत आहेत. बांदेकर यांच्या योग सेवेची दखल घेत त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ज्ञान उदय फाउंडेशनचे डायरेक्टर नागेश राठोर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.