कोकण

विद्यार्थ्यांचा वन्य पशू-पक्ष्यांशी ''संवाद''

CD

swt102.jpg
23597
दांडेली ः काली नदीत जलक्रीडेसाठी सज्ज असताना विद्यार्थी व कॉलेज कर्मचारी.

विद्यार्थ्यांचा वन्य पशू-पक्ष्यांशी ‘संवाद’
कर्नाटकातील जंगल सफर ः पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजची क्षेत्र भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः कर्नाटक राज्यातील सर्वात मोठ्या वन्यजीव अभयारण्यात हुमरमळा येथील श्री पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्र भेट पार पडली. दांडेली अभयारण्य दुर्मीळ प्राणी, पक्षी व वनसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटातील हे एक निसर्गरम्य पर्यटन केंद्रही आहे. विशेषत: रिव्हर राफ्टिंग व जंगल सफारीसाठी ते ओळखले जाते. काळ्या पाण्याची झाक असलेली येथील ‘काली’ नदी गूढ तितकीच रम्य आहे. शैक्षणिक क्षेत्र भेटीच्या दृष्टीने फार्मसी विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण उत्तम असल्याचा विद्यार्थ्यांना तिथे अनुभव आला.
डिप्लोमा प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या दोन दिवसीय क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांनी जंगल सफारीत वैविध्यपूर्ण वन, प्राणी व जलसंपदेचे निरीक्षण व अभ्यास केला. तेथील ख्यातनाम ‘काली’ नदीवरील जलक्रीडा प्रकारांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. बोटींग, राफ्टिंग, कायकिंग, झिपलाईन आदी थरारक प्रकारांचा यात समावेश होता.
दांडेली अभयारण्यात एका रिसॉर्टवर विद्यार्थ्यांचा मुक्काम होता. तिथे नाच-गाण्यांनी व विविध इनडोअर खेळांनी आपली कला सादर करीत या भेटीला रंगत आणली. परतीच्या प्रवासात येल्लूर येथील प्रसिद्ध राजहंस गडावर फेरफटका मारला. या क्षेत्रभेट व सहलीचे नियोजन व संचालन अधिव्याख्याता गणू गावडे यांनी सहाय्यक प्राध्यापिका सेलेना फर्नांडिस व प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रकाश चव्हाण यांच्या सोबतीने केले. संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब व प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT