कोकण

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकलफेरी

CD

rat१०p१०.jpg-
P२६O२३६०६
रत्नागिरी : गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्रींची मूर्ती व गाभारा आकर्षक पुष्पसजावटीने सजवण्यात आला तर दुसऱ्या छायाचित्रात प्रकट दिनानिमित्त सायकल फेरी काढणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य.
----
सायकलफेरीतून भक्तीचा संदेश
गजानन महाराज प्रकट दिन ; ‘जय गजानन’ राईड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : श्री गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिनानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित ‘जय गजानन सायकल राईडला’ उदंड प्रतिसाद मिळाला. ही फेरी शरीराला तंदुरूस्त ठेवणारी, मनाला शांतता देणारी आणि भक्तीची ऊर्जा प्रदान करणारी ठरली.
नाचणे पॉवरहाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर ते गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत ही फेरी काढण्यात आली. जय गजानन, श्री गजानन असा जयघोष करत फेरीमध्ये क्लबचे सदस्य आणि रत्नागिरीकर सहभागी झाले. श्रद्धा, आरोग्य आणि एकात्मता यांची सांगड या फेरीने घातली. सकाळी ६.३० वा. नाचणे येथे महाराजांचे दर्शन घेऊन फेरीला सुरुवात करण्यात आली. या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष देसाई यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करत क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांचा सन्मान केला. ही फेरी जयस्तंभमार्गे भाट्ये, वायंगणी, कोळंबे फाटा, फिनोलेक्स फाटामार्गे गोळप येथे पोहोचली.
फेरीमध्ये सात ते ७४ वर्षे वयोगटातील ३५ सायकलस्वारांनी भाग घेतला. सात वर्षाचा वेदांत पावसकर आणि ७४ वर्षांचे गजानन भातडे हे न चुकता या फेरीत सहभागी होत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. शालेय विद्यार्थीही या फेरीत आनंदाने सहभागी झाले. गोळप येथे कोतवडे, सड्ये, बसणी या भागातून हौशी सायकलस्वारही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबसोबत सामील झाले. गोळप येथे मंदिरापर्यंत सायकल फेरी पोहोचल्यानंतर श्री गजानन महाराज देवस्थानचे माधव गोगटे यांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातर्फे अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT