जिल्ह्याचा हवामान कृती आराखडा तयार
१८ला सादरीकरण; जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : हवामान बदलाचे संकट आणि निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीला बसणारा त्याचा फटका लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी विशेष ‘विकास आणि हवामान कृती आराखडा’ तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्याचे सादरीकरण आणि त्यावर चर्चा करण्यासाठी १८ फेब्रुवारीला विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विकास साधताना पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल यासाठी आयफॉरेस्ट (I FOREST) या संस्थेने ज्ञान भागीदार म्हणून हा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्याचा विकास, हवामान बदलाशी जुळवून घेणे, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे, पर्यावरण व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करणे यावर या आराखड्यात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. रत्नागिरीला ‘कार्बन-न्यूट्रल’ जिल्हा बनवण्याचे उद्दिष्ट या द्वारे ठेवण्यात आले आहे.
या आराखड्याच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिक संस्था आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी हॉल येथे सादरीकरण होणार आहे. या चर्चासत्रात स्थानिक नागरी समाज संघटना, पंचायतराज संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि समुदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
----
कोट
जिल्ह्याच्या भविष्यातील नियोजनासाठी या आराखड्यातील तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या प्रक्रियेत स्थानिक घटकांचा सहभाग आणि त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. तरी जास्तीत जास्त प्रतिनिधींनी या चर्चासत्राला उपस्थित राहावे.
- सुनीता निंबाळकर, वातावरण फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.