कोकणची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार न्या
उदय सामंत ः नवनिर्माण संस्थेच्या ‘विलुप्त कोकणला’ प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः येथील ‘एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी’ (नवनिर्माण संस्था) तर्फे आयोजित ‘विलुप्त कोकण’ या भव्य थीम डिनरचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. कोकणची प्राचीन आणि दुर्मिळ खाद्यसंस्कृती जतन करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
या वेळी मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थी, जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे, ही काळाची गरज आहे. नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाने कोकणची ही चविष्ट खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार न्यावी, अशी आमची अपेक्षा आहे तसेच चंदन भडसावळे म्हणाले, आज सगुणा बागेत आठवड्याला १ हजार पर्यटक येतात. कोकणातील प्रत्येक वाडी, डोंगर आणि नद्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत. अशा महोत्सवातून पर्यटनाला नवी चालना मिळेल.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. मेघना शेलार, प्रा. खांडेकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी रूद्र जाधव यांच्या टीमने महिनाभर कष्ट घेतले. या टीमने विशेष ‘आर अँड डी’ (संशोधन) करून तिवाल, पंगोजी, शहाळे-काजू तोंडाक, हुलग्याचे मांडगे, किसमुर, कोलीम भजी, आंबोळी आणि खांतोलीसारख्या विस्मरणात गेलेल्या शिवकालीन पदार्थांना पुन्हा शोधून काढले. या वेळी अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष डॉ. अलिमियाँ परकार, संचालिका सीमा हेगशेट्ये, मृत्युंजय खातू, डॉ. केतन चौधरी, बिपिन बंदरकर, राहुल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.