कोकण

चरित्रकार कीर स्मृती लेख स्पर्धेचा निकाल जाहीर

CD

चरित्रकार कीर स्मृती लेख
स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी ः थोर चरित्रकार, विचारवंत आणि पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हास्तरीय लेखस्पर्धेचे आयोजन केले होते. लेखस्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. ही स्पर्धा महाविद्यालय आणि खुला गट अशा दोन गटात आयोजित केली होती. लेख स्पर्धेच्या खुल्या गटात प्रथम मंजुश्री भागवत, द्वितीय श्रीनिवास सरपोतदार आणि तृतीय क्रमांक विभागून पद्मजा कारेकर व स्वानंदी जोगळेकर यांना जाहीर झाला आहे. महाविद्यालयीन गटात प्रथम अनिकेत नाडणकर यांना जाहीर झाला आहे. बक्षीस वितरण २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त वार्षिक अधिवेशनात गौरवण्यात येणार आहे.
------
रत्नागिरीत १६ ला
महिला लोकशाही दिन
रत्नागिरी : फेब्रुवारी २०२६ चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित केला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळवले आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. या वेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
--------
बौद्ध समाजातील
संस्थांना अनुदान
रत्नागिरी ः राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी १० लाख रुपयापर्यंत अनुदान योजनेसाठी २० फेब्रुवारीपूर्वी जिल्हा अल्पसंख्यांक कक्ष, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर गोळीबार

Kolhapur ZP–PS Results : करवीरमध्ये सत्तेची समीकरणे बदलली; पंचायत समितीत राष्ट्रवादी-भाजप सत्तेकडे

"तो सगळ्यांची वाट बघत होता" सूरज चव्हाणच्या लग्नाविषयी जान्हवीचा खुलासा ; "त्याला वाईट वाटलं.."

दररोज ट्रेनने प्रवास करते झी मराठीची लोकप्रिय अभिनेत्री; सीएसएमटी वरून कशी गाठते मालवणी? म्हणते, 'लोकांना वाटतं की...'

Kolhapur Municipal : महापौर-उपमहापौर निवडीनंतर कोल्हापूर महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा, समिती नियुक्तीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT