कोकण

आंबा बागायतदारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

CD

आंबा बागायतदारांसाठी
आज ऑनलाईन मार्गदर्शन
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्यातील आंबापिकावरील फूलकीड नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीडरोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सरसावले आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी विशेष वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शक मालिकेचे चौथे ऑनलाईन सत्र बुधवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. बदलत्या हवामानामुळे आंबापिकावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये कोकण कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ बागायतदारांशी थेट संवाद साधून तांत्रिक माहिती देणार आहेत, तसेच फूलकीड आणि इतर रोगांवर प्रभावी व वेळेत करावयाच्या उपाययोजना, बदलत्या वातावरणात आंबा मोहोर टिकवून धरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या बागेतील समस्यांबाबत शास्त्रज्ञांना थेट प्रश्न विचारून उत्तरे मिळवता येतील. दिलेल्या वेबिनार लिंकवरती शेतकऱ्यांनी ऑनलाइन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या बागेचे रक्षण आणि दर्जेदार उत्पादनासाठी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या भागातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; 24 तासांत 21 मिमी सरासरी पाऊस, चार महसूल मंडळांत अतिवृष्टी

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

Pune Traffic jam: हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT