कोकण

रत्नागिरी-महासंचालिकांची रत्नागिरीला भेट

CD

कृषी शिक्षण, संशोधन परिषदेच्या
महासंचालिकांची रत्नागिरीला भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील महासंचालिका वर्षा लड्डा-उंटवाल यांनी सोमवारी (ता. ९) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत असलेल्या येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी केंद्रातील संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेऊन शास्त्रज्ञांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी महासंचालिकांचे स्वागत केले. लड्डा-उंटवाल यांनी झाडगाव येथील मत्स्यालय, मत्स्य संग्रहालय आणि विस्तार शिक्षणकार्याची पाहणी केली. नवीन संशोधन प्रकल्प सादर करताना शास्त्रज्ञांनी कोणत्या तांत्रिक बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
संशोधन केंद्रात राबवल्या जाणाऱ्या महसुली उत्पन्न प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच, महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कल्पक योजनांवर विचार करण्याचे सुचवले. पेठकिल्ला येथे सुरू असलेल्या संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबतही या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मत्स्य महाविद्यालयाचे (शिरगाव) सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे, सहयोगी संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक सदावर्ते व अपूर्वा सावंत उपस्थित होत्या. संशोधन केंद्राने भविष्यात शेतकरीभिमुख कार्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचनाही महासंचालिकांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT