कोकण

''डीपीडीसी''ची आज सिंधुदुर्गनगरीत सभा

CD

सिंधुदुर्गनगरीत आज
नियोजन समितीची सभा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः जिल्हा नियोजन समितीची सभा उद्या (ता. ११) सकाळी ११ वाजता येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला खासदार नारायण राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आदी उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर निधी खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. आर्थिक वर्ष संपायला अद्याप दीड महिना शिल्लक आहे. पालकमंत्री राणे यांच्या संकल्पनेनुसार मंजूर निधी फेब्रुवारी अखेर खर्च झाला पाहिजे, तर मार्च अखेर राज्याकडून अधिकचा निधी आणता येईल. त्या दुष्टीने या सभेत आढावा घेतला जाणार आहे. तसेच २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागांकडून कामांची यादी मागवून घेत आराखडा तयार करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे ही सभा महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Deglur Bhukhand: कर्मचाऱ्यांसाठीचे भूखंड इतरांच्या घशात? देगलूर प्रकरणात चौकशीचे आदेश, सहकार क्षेत्रात खळबळ

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

SCROLL FOR NEXT