कोकण

ॲड. परुळेकरांना ‘प्र. श्री. नेरुरकर’ पुरस्कार जाहीर

CD

23699

ॲड. परुळेकरांना
‘प्र. श्री. नेरुरकर’
पुरस्कार जाहीर
बांदा, ता. १० ः येथील नट वाचनालयातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार’ यंदा वेंगुर्ले येथील प्रसिद्ध संत साहित्यिक तथा लेखक ॲड. देवदत्त परुळेकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी (ता. १४) दुपारी ४ वाजता आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. ॲड. परुळेकर यांनी संत साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी ओवी, अभंग, संतकाव्य, भक्तीपर लेखन तसेच विविध माध्यमांतून साहित्यसेवा सातत्याने सुरू ठेवली आहे. त्यांच्या लेखनातून अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचा ठसा ठळकपणे जाणवतो. दैनिकांमधील लेखमालिका, साहित्यिक सदरे तसेच सोशल मीडियावरील कार्यक्रमांमुळे त्यांनी संत साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य केले आहे. ते विविध सामाजिक-साहित्यिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक व्याख्याने, प्रवचने व कीर्तने सादर केली आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत नट वाचनालयाने यंदाचा पुरस्कार त्यांना जाहीर केल्याची माहिती कार्यकारी मंडळाने दिली. या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी, मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT