कोकण

-४९९ प्रकल्पांनी घेतले योजनेचे अनुदान

CD

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना
४९९ प्रकल्पांना लाभ, तालुक्यांत विशेष कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४९९ प्रकल्पांना या योजनेचा लाभ दिला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत तालुकास्तरावर विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन प्रक्रिया उद्योग उभारण्यास इच्छुक शेतकरी, प्रक्रियादार व अर्जदारांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन सदाफुले यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार, १६ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान राबवण्यात येणाऱ्या विशेष अभियानांतर्गत या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. बुधवारी (ता. ११) लांजा तहसील कार्यालय सभागृह, तालुका कृषी अधिकारी कार्यालय (चिपळूण) व दापोली येथे आयोजन करण्यात आले आहे तसेच १२ फेब्रुवारीला तालुका कृषी अधिकारी कार्यालय राजापूर, संगमेश्वर व खेड या ठिकाणी कार्यशाळा होणार आहेत. या कार्यशाळांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती आणि बँक शाखा अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान, योजनेची सविस्तर माहिती देणे, नवीन इच्छुकांची अर्ज नोंदणी करणे, बँकस्तरावर प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावांचा निपटारा करणे आणि नोंदणी केलेले अर्ज पूर्ण करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवणे, असे उपक्रम राबवले जातील.
----
चौकट
असे मिळते अनुदान
प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी वैयक्तिक व गट सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीकरिता प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ घेता येतो. तसेच सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व कमाल ३ कोटी रुपयांपर्यंत लाभ दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT