-rat११p६.jpg -
P२६O२३८१४
शर्वरी नागवेकर-वैद्य
------
खल्वायनच्या मैफलीत १४ला
शर्वरी वैद्य यांचे गायन रंगणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : खल्वायन संस्थेची ३२२वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १४) रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जांभेकर विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध गायिका शर्वरी नागवेकर-वैद्य यांचे शास्त्रीय गायनासह अभंग आणि नाट्यगितांचा सुरेल आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
(कै.) महर्षी गणेश रामचंद्र बेहेरे व (कै.) रामकृष्ण गणेश बेहेरेबुवा (कुर्धे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही विशेष संगीत मैफल रंगणार आहे. वैद्य यांनी लहान वयातच संगीत शिक्षणास प्रारंभ केला. प्रारंभी राम दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले तर पुढे पंडित सुहास व्यास यांच्याकडे ग्वाल्हेर-आग्रा घराण्याची तालीम त्यांनी घेतली. त्या संगीत विशारद व एमए (संगीत) पदवीधर असून, भारत सरकारची शिष्यवृत्तीही त्यांनी मिळवली आहे. सवाई गंधर्व महोत्सव, उपवन महोत्सव, गुणीजन बैठक, कृष्णा महोत्सव, पंचम निषाद, हैदराबाद संगीत संमेलन आदींमध्ये त्यांनी १५०हून अधिक गायनाचे कार्यक्रम केले आहेत. त्या श्री वल्लभ संगीतालय (मुंबई) येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. देशभरातील अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी गायन सादर केले आहे. मैफलीत तबलासाथ सोहम जोशी तर हार्मोनियमसाथ अमित ओक करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.